मालिका आणि चित्रपटांतील आपल्या अभिनयामुळे सुयश टिळकने प्रेक्षकांच्या मनामध्ये अढळ स्थान निर्माण केले आहे. नेहमी आपल्याला शांत आणि सोज्वळ भूमिकांमध्ये दिसणारा सुयश थोडा खट्याळ आहे अस सांगितल तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. आता तुम्ही म्हणाल सुयशने नक्की केले तरी काय. तर सध्या सुयश टिळक डोळा मारत आहे. आता सुयश कोणाला आणि का डोळा मारतोय हे तरी समजलेले नाही. सोशलमीडियावर तर सुयशचा डोळा मारलेला फोटो चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. हा फोटो खुद्द सुयशनेच त्याच्या टविटर अकाऊंटवर अपलोड केला आहे. सुयशच्या या आगळ््या वेगळ््या पोझचे कौतूक तर त्याचे चाहते नक्कीच करत असतील. हा फोटो गणेशोत्सव मिरवणूकीत क्लिक केल्याचे समजत आहे. सुयशने बाप्पाच्या मिरवणूकीत मनमुराद ढोल वाजविण्याचा आनंद देखील लुटला होता. आणि त्याच जल्लोषाच्या भरात कदाचित सुयशला डोळा मारून फोटो काढण्याचा मोह आवरता आला नसणार. ते काहीही असले तरी सुयशचा हा फोटो मात्र झक्काल आलाय एवढे खरे.
सुयशने मारला डोळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2016 18:24 IST