Join us

सुयशला झाली दुखापत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2016 11:47 IST

सुयश टिळक क्रिकेट या खेळाचा चाहता आहे. काही दिवसांपूर्वी मराठी इंडस्ट्रीतील मंडळींसाठी आयोजित केलेल्या एका क्रिकेट टुर्नामेंटच्यावेळी त्याच्या खांद्याला ...

सुयश टिळक क्रिकेट या खेळाचा चाहता आहे. काही दिवसांपूर्वी मराठी इंडस्ट्रीतील मंडळींसाठी आयोजित केलेल्या एका क्रिकेट टुर्नामेंटच्यावेळी त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती. बॅटिंग करत असताना त्याचा खांदा दुखावला होता. यासाठी सध्या तो उपचार घेत आहे. याविषयी सुयश सांगतो, बॅटिंग करत असताना मला छोटीशी दुखापत झाली असून मी सध्या आराम करत आहे. माझी तब्येत आता चांगली असून मी लवकरच पुन्हा कामाला सुरुवातही करणार आहे. सुयश लवकरात लवकर बरा होवो आणि त्याच्या कामाला पुन्हा सुरुवात करो, अशी आमच्याकडूनदेखील त्याला सदिच्छा.