‘सस्ती चिझों का शौक हम भी नही रखते’ हा सुशांत शेलारचा 'दुनियादारी' चित्रपटातला फार प्रसिध्द डायलॉग आहे. हा डायलॉग सुशांतने सिध्द करुन दाखवला आहे.
महाराष्ट्र कलानिधी चे सरचिटणीस आणि अभिनेता सुशांत शेलार याची अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या "सल्लागार" पदी निवड झाली आहे.
मेघराज राजेभोसले यांची महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यापासून महामंडळामध्ये काही बदल करण्यात आले आणि सामाजिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं. अर्थात हे मराठी चित्रपटसृष्टीसाठी फायदेशीर ठरेल.