केतकीच्या बर्थडेला फुंतरुचे सरप्राईज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2016 02:44 IST
केतकी माटेगावकरने तिच्या चित्रपटांतून नेहमी विविधांगी भुमिका साकारुन मराठी इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली ...
केतकीच्या बर्थडेला फुंतरुचे सरप्राईज
केतकी माटेगावकरने तिच्या चित्रपटांतून नेहमी विविधांगी भुमिका साकारुन मराठी इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशाच एका हटके रोल आणि डिफरंट लुकमध्ये केतकी तिच्या आगामी फुंतरु या सिनेमामध्ये प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. केतकीच्या वाढदिवसानिमित्त या सिनेमाचे म्युझिक लाँच पुण्यात करण्यात आले. खास केतकीसाठी फुंतरु असे लिहिलेला केक मागविण्यात आला होता. आणि सर्वच टिमने तिला वाढदिवसाचे असे म्युझिकल सरप्राईज दिले.