Join us

सुरेश वाडकर यांची अध्यक्षपदी निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2016 11:29 IST

गायक सुरेश वाडकर यांच्या आवाजाची जादू संपूर्ण भारतभर झाली आहे. सुरेश वाडकर हे मराठी गायक आहेत. मराठी, हिंदी चित्रपटांसाठी ...

गायक सुरेश वाडकर यांच्या आवाजाची जादू संपूर्ण भारतभर झाली आहे. सुरेश वाडकर हे मराठी गायक आहेत. मराठी, हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी गाणी गायली आहेत. तसेच कोकणी, मल्याळी, भोजपुरी, बंगाली, गुजराती आणि उर्दू भाषेतही त्यांनी गाणी गायली आहेत. वयाच्या आठव्या वर्षापासून त्यांनी जियालाल वसंत यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले. भावगीत आणि भक्तीगीतांमधून ते श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतात.  अखिल भारतीय नाट्य परिषद, आशा भोसले पुरस्कार यांसारख्या अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आलं आहे. 

अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले सुरेश वाडकर यांच्या यशामध्ये आणखी एका गोष्टीची भर पडली आहे. ती गोष्ट म्हणजे सुरेश वाडकर यांची मुंबई विद्यापाठीतील बोर्ड ऑफ स्टडिज इन हिंदुस्थानी म्युझिकच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.