काल वानखेडेवर मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु (RCB) हा IPL सामना बघायला मिळाला. अटीतटीच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मुंबई इंडियन्सला वानखेडेवर हरवलं. या सामन्यात आगामी 'झापुकझुपूक' सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी सूरज चव्हाण (Suraj Chavan) वानखेडेवर गेला होता. सूरजसाठी हा क्षण खास होता. कारण पहिल्यांदाच सूरज क्रिकेट सामना पाहण्यासाठी वानखेडेवर गेला होता. त्यावेळी RCB चा कॅप्टन विराट कोहलीला (Virat Kohli) पाहून सूरज चव्हाणची रिअॅक्शन चर्चेत आहे. काय केलं सूरजने? जाणून घ्या
किंग कोहलीला पाहून सूरजने काय केलं
सूरजच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत 'झापुकझुपूक' सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी सूरज वानखेडेवर गेलेला दिसतोय. त्यावेळी स्टेडियममधून मॅच बघत असताना सूरजच्या समोर विराट कोहली आला. किंग कोहलीला पाहून सूरजच्या आनंदाला उधाण आलं. "कोहली समोरच हाय", असं तो कॅमेरात म्हणताना दिसतो. त्यानंतर सूरजने हा व्हिडीओ शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलंय की, 'किंग कोहली आणि तुमचा टॉपचा किंग समोरा समोर…! पहिल्यांदाच येवढ्या मोठ्या वानखेडे स्टेडियम वर मॅच बघायला गेलो आणि आपल्या 🇮🇳भारत देशाचा विराट भाऊ जवळून दिसला…!'
अशाप्रकारे सूरजने वानखेडेवर रंगलेल्या मॅचचा आनंद घेतला. "झापुक झुपूक" या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या सिनेमामध्ये सूरजसोबत मराठी कलाकार जसे जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी आणि दीपाली पानसरे हे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. केदार शिंदे दिग्दर्शित "झापुक झुपूक" हा सिनेमा येत्या २५ एप्रिल २०२५ रोजी महाराष्ट्रतील सिनेमागृहांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.