Join us

सुप्रिया पिळगांवकर यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2016 17:30 IST

प्रत्येक व्यक्तीच्या हाती जुन्या फोटोंचा अल्बम लागला की, ती व्यक्ती जुन्या आठवणीत रमत असते. त्याचप्रमाणे आपले हे जुने फोटो ...

प्रत्येक व्यक्तीच्या हाती जुन्या फोटोंचा अल्बम लागला की, ती व्यक्ती जुन्या आठवणीत रमत असते. त्याचप्रमाणे आपले हे जुने फोटो पाहून ती व्यक्ती स्वत:शीच हसत राहते. त्यावेळी प्रत्येकाच्या मनात एकच भावना निर्माण होतात की, अरं आपण त्यावेळी कसे होतो. असेच काहीसे प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर यांना वाटत आहे. कारण सुप्रिया यांनी नुकतेच त्यांच्या या जुन्या आठवणींना सोशलमीडियावर उजाळा दिला आहे. त्यांनी आपला एक जुना फोटो सोशलमीडियावर अपलोड केला आहे. या फोटोमध्ये त्यांच्यासोबत सचिन पिळगांवकरदेखील आहेत. त्याचबरोबर त्यांनी एक पोस्टदेखील शेअर केली आहे. ते आपल्या पोस्टच्या माध्यमातून सांगतात की, फार लहान केस, मोठी काळी टिकली, चोकर आणि साडी म्हणत त्यांनी हास्य करतानाचे काही सिम्बोल टाकले आहे. हा फोटो पाहून त्यांनादेखील हसू आवरले नसल्याचे दिसत आहे. त्यांच्या या फोटोला सोशलमीडियावर भरभरून लाइक्स मिळताना दिसत आहे. मराठी चित्रपटसृष्टीचा हीट जोडीचा जुना ब्लॅक व्हाइट फोटो पाहून त्यांचे चाहतेदेखील पुन्हा त्यांच्या प्रेमात नक्कीच पडेल. सुप्रिया यांनी दिल्ली वाली ठाकूर गर्ल्स, एक नणंद की खुशियो की चाबी.. मेरी भाभी, ससुराल गेंदा फूल यांसारख्या अनेक हिंदी मालिकांमध्ये त्यांनी आईची भूमिका साकारली आहे. तसेच त्यांनी आम्ही सातपुते, एकुलती एक, नवरा माझा नवसाचा, अशी ही बनवाबनवी असे अनेक सुपरहीट चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. तसेच त्यांची मुलगी श्रिया पिळगांवकर हिनेदेखील एकुलती एकी या मराठी चित्रपटाने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. तसेच ती  बॉलिवुडचा तगडा अभिनेता शाहरूख खानसोबत फॅन या चित्रपटातदेखील झळकली होती.