Join us

सुनिलचा फोटोग्राफी फंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2016 14:43 IST

हल्ली लहान मुलांपासून ते मोठयापर्यत प्रत्येकाला सेल्फी, सिंगल व ग्रुप फोटो काढण्याची मोठी हौस असते. जिथे जाईन तिथे प्रत्येकाच्या ...

हल्ली लहान मुलांपासून ते मोठयापर्यत प्रत्येकाला सेल्फी, सिंगल व ग्रुप फोटो काढण्याची मोठी हौस असते. जिथे जाईन तिथे प्रत्येकाच्या मोबाईलचा कॅमेरा सुरूच झाला समजा. पण प्रत्येकजण फेसबुक, टिवीटर, व्हॉटसअ‍ॅप अशा सोशलमिडीयावर शेअर करण्यासाठी सर्वजण मोठया तोरात फोटो काढत असतात. पण प्रेक्षकांचा लाडका कलाकार सुनिल बर्वे हा अभिनेता आपला छंद जोपासण्यासाठी फोटोगा्रफी करत असतो. त्याच्या या छंदाविषयी लोकमत सीएनएक्सशी बोलताना सुनिल म्हणाला, हा जो फोटो आहे माझा माझ्या पत्नीने क्लिक आहे. त्याला एडिट करण्याचे काम मी केले आहे. असाच कामातून जर वेळ मिळाला तर संधीचा फायदा घेत मी फोटोग्राफीचा छंद जोपासतो. माझी पत्नीदेखील कमरर्शि़यल आर्टिस्ट आहे. तर माझ्या मुलाचा देखील फोटोग्राफीच कोर्स झाला आहे. यामुळे फोटोग्राफी हा विरंगुळा मला घरातूनच मिळाला आहे. तसेच दिग्दर्शक जेव्हा कॅमेरेचे अ‍ॅगल घेतात त्यावेळी ते पाहण्यासाठी देखील मी उत्सुक असतो. टेक्नीकली मला शिकण्याची खूप उत्सुकता असते. माझे म्युझिकवर जितके प्रेम आहे तितकेच फोटोग्राफीवर देखील आहे. या छंदाबरोबरच मी झाडांची देखील काळजी घेत असतो. पण प्रत्येक माणसाने आपल्या कामाबरोबरच आपला छंद देखील जोपासला पाहिजे. जेणेकरून आजकालच्या धावत्या जीवनातून माणसाला थोडा आनंद मिळेल.