Join us
Daily Top 2Weekly Top 5

संजय लीला भन्साळींच्या सिनेमातील ही हिरोईन आहे एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पत्नी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 07:15 IST

या फोटोत तिचा स्टनिंग आणि घायाळ करणार अंदाज पाहायला मिळतो आहे.

आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री सुखदा खांडकेकर सोशल मीडियावर सुखदा अ‍ॅक्टीव्ह असते. तिच्या चाहत्यांसह तिचे ग्लॅमरस फोटो ती शेअर करत असते. नुकतेच तिने सोशल मीडियावर नवीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिचा स्टनिंग आणि घायाळ करणार अंदाज पाहायला मिळतो आहे. सोशल मीडियावर सुखदाचा हे फोटो व्हायरल होतोय. 

'हीच तर प्रेमाची गंमत आहे' या नाटकात सुखदाने डॉ. अमोल कोल्हेंसोबत भूमिका साकारली होती. 'धरा की कहानी' या हिंदी मालिकेतही तिने काम केले आहे. संजय लीला भन्साली यांच्या गाजलेल्या 'बाजीराव मस्तानी' या सिनेमातही सुखदाने काम केले आहे. बाजीरावांची बहिण अनुबाईंची भूमिका सुखदाने साकारली होती. सुखदाचा युट्यूबवरील अनसेन्सॉर्ड हा चॅट शोसुद्धा प्रसिद्ध आहे.

 अभिजीत आणि सुखदा हे दोघंही मूळचे नाशिकचे. अभिजीतचा नाटकातील आणि सुखदाच्या डान्समधील एका कॉमन फ्रेंडमुळे दोघांची एकमेकांशी ओळख होती. मात्र दोघं कधीही एकमेकांशी बोलले नव्हते. त्याच काळात अभिजीतची माझिया प्रियाला प्रीत कळेना ही मालिका लोकप्रिय ठरली होती.

टॅग्स :सुखदा खांडकेकरअभिजीत खांडकेकर