Join us

सुखदा खांडकेकरचा ट्रॅडिशनल अंदाज पाहून तुम्हीही व्हाल घायाळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 08:00 IST

आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री सुखदा खांडकेकर. सोशल मीडियावर सुखदा बरीच अॅक्टिव्ह असते.

ठळक मुद्देसोशल मीडियावर सुखदा बरीच अॅक्टिव्ह असतेतिचे सोज्वळ सौंदर्य रसिकांना घायाळ करते आहे.

ग्लॅमर इंडस्ट्रीत अभिनयासोबतच स्टाईल स्टेंटमेंटला तितकंच महत्त्व असते. प्रत्येकाची स्टाईल ही निराळी असते.  आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री सुखदा खांडकेकर. सोशल मीडियावर सुखदा बरीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते.

आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासह शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी सुखदाने आपल्या साडीमधला एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यात तिचे सोज्वळ सौंदर्य रसिकांना घायाळ करते आहे. या फोटोतील तिचा सिंपल लूक तिच्या सौंदर्याला चार चांद लावतो आहे. 

सुखदा खांडकेकर ही कथ्थक नृत्यांगणा आहे. हीच तर प्रेमाची गंमत आहे या नाटकात सुखदाने डॉ.अमोल कोल्हेंसोबत भूमिका साकारली होती. धरा की कहानी या हिंदी मालिकेतही तिने काम केले आहे.संजय लीला भन्साली यांच्या गाजलेल्या बाजीराव मस्तानी या सिनेमातही सुखदाने काम केले आहे. बाजीरावांची बहिण अनुबाईंची भूमिका सुखदाने साकारली होती.सुखदाचा युट्यूबवरील अनसेन्सॉर्ड हा चॅट शोसुद्धा प्रसिद्ध आहे. सुखदाने गुरूकूल, उमराव असे अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे.

टॅग्स :संजय लीला भन्साळी