Join us

सुबोधच्या पिनेय्यमचे शुटिंग संपले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2016 14:23 IST

              मराठी चित्रपटसृश्टीला अनेक दर्जेदार सिनेमे दिल्यानंतर आपला रांगडा अभिनेता सुबोध भावे याने ...

              मराठी चित्रपटसृश्टीला अनेक दर्जेदार सिनेमे दिल्यानंतर आपला रांगडा अभिनेता सुबोध भावे याने मल्याळम सिनेसृश्टीत त्याच्या करिअरचा श्रीगणेशा केला. पहिलाच मल्याळम चित्रपट अन तो ही दिग्दर्शक अदुर गोपालकृश्णन यांचा म्हणजे आपल्या सुबोधच्या मल्याळम चित्रपटातील पदार्पणाल चार चाँद लागले असेच म्हणावे लागेल. मागील काही दिवसांपासुन सुबोध सोशल साईट्सवरुन त्याच्या या चित्रपटासंदर्भात अनेक अपडेट्स देतच आहे. केरळ येथील त्याचे शुटिंग तर त्याने एकदमच एंजॉय केले होते. अनेक मजेशीर अनुभव घेत अन या मोठ्या कलाकारंकडुन बºयाच गोष्टी शिकत सुबोधने त्याच्या या चित्रपटाचे शुटिंग कमप्लिट केले आहे. पिनेय्यमचे चित्रीकरण पुर्ण झाले असल्याचे सुबोधने सोशल साईट्सवरुन सांगितले आहे. एवढेच नाही तर सुबोधने या चित्रपटाच्या सेटवरील एक झक्कास सेल्फी देखील अपलोड केला आहे. पिनेय्यम याचा अर्थ होतो पुन्हा आता या चित्रपटाच्या नावावरुन तरी पुन्हा नक्की काय घडणार आहे याचीच उत्सुकता सुबोधच्या चाहत्यांना लागली असणार एवढे मात्र खरे.