१६ वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अदूर गोपालक्रिष्णन हे भारतातील समांतर चित्रपटाचा पाया रचणा-यांपैकी एक आहेत.
मराठी चित्रपटसृष्टीतील अभिमानाची बाब ही आहे की अभिनेता सुबोध भावे हा अदूर गोपालक्रिष्णन दिग्दर्शित ‘पिन्नेयम’ (English: Again) या रोमँटिक मल्याळी चित्रपटात दिसणार आहे. अदूर गोपालक्रिष्णन यांच्यासोबत सुबोधला काम करण्याची संधी मिळाली ही मराठी चित्रपटसृष्टीसाठी आनंदाची गोष्ट आहे.
याविषयी नुकतंच सुबोध भावे याने त्याच्या ट्विटर अकाऊंट वरुन ट्विट केलंय की अदूर सरांसोबत आणि मल्याळम सुपरस्टार दिलीपसोबत शूटिंग करताना केरळ मधील वातावरणाचा आनंद घेत आहे.