Join us

लुडोला दिली ओसरी लुडो हातपाय पसरी...  सुबोध भावेच्या घरचा ‘लुडो बोर्ड’ लय भारी...!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 11:45 IST

सुबोधने शेअर केलेला फोटो चर्चेचा विषय ठरला आहे.

ठळक मुद्देसध्या लॉकडाऊनच्या काळात अनेकजण टाइमपास म्हणून लुडो खेळताना दिसत आहे.

चंदेरी दुनियेतील स्टार्स म्हणजे कमालीची बिझी माणसं... पण लॉकडाऊनमुळे हे स्टार्सही घरी बसलेत. बॉलिवूडसह मराठी कलाकार सध्या आपआपल्या घरात राहून कधी नव्हे इतका वेळ कुटुंबासोबत घालवत आहेत. मराठमोळा सर्वांचा आवडता स्टार सुबोध भावे हाही कुटुंबासोबत वेळ घालवतोय. या काळात सोशल मीडियावही तो आधीपेक्षा अधिक अ‍ॅक्टिव्ह झालाय. लॉकडाऊनमधले मुलांसोबतचे अनेक फोटो तो शेअर करत असतो. सुबोधने नुकताच एक फोटो त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आणि या फोटोच्या अतरंगी कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

होय, नुकताच त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला़  लुडोला दिली ओसरी लुडो हातपाय पसरी... असे कॅप्शन त्याने या फोटोला दिले.सुबोधने यासोबत शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याचा मुलगा मल्हार आणि कान्हा जमिनीवर झोपून लुडो खेळताना दिसत आहे आणि हा लुडो साधा लुडो नाही. तर भावे फॅमिलीने संपूर्ण चादरीवरच लुडो बोर्ड बनवला आहे. सुबोधने शेअर केलेल्या या फोटोवर अनेक मराठी स्टर्सच्या कमेंट पाहायला मिळत आहे. अनेकांनी यावर विनोदी कमेंट केल्या आहेत.

सध्या लॉकडाऊनच्या काळात अनेकजण टाइमपास म्हणून लुडो खेळताना दिसत आहे. एवढंच नाही तर यावर अनेक मीम्स सुद्धा तयार करण्यात आले होते. ज्यात लुडोला जागतिक खेळाचा दर्जा द्यावा असे विनोदाने म्हणण्यात आले होते. आता सुबोधने हा  फोटो शेअर करत अधिकच रंगत आणली आहे,असेच म्हणायला हवे.

टॅग्स :सुबोध भावे