Join us

सुबोध भावे का म्हणतोय ‘तुला कळणार नाही’?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2017 15:46 IST

सध्या मराठी सिनेमाची आकर्षक टायटलमुळे प्रदर्शनापूर्वीच रसिकांपर्यंत पोहचतात. नकुतेच प्रदर्शित झालेले 'मला काहीच प्रॉब्लेम नाही','भेटली तू पुन्हा',ती सध्या काय ...

सध्या मराठी सिनेमाची आकर्षक टायटलमुळे प्रदर्शनापूर्वीच रसिकांपर्यंत पोहचतात. नकुतेच प्रदर्शित झालेले 'मला काहीच प्रॉब्लेम नाही','भेटली तू पुन्हा',ती सध्या काय करतेय,ती आणि इतर अशा हटके आणि वेगळ्या संकल्पनेवर आधारित सिनेमांनी रसिकांना फुल ऑन एंटरटेन केले.आता पुन्हा एकदा तुला कळणार नाही या नावाचा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे.‘मितवा’  ‘लाल इश्क’ ‘फुगे’ सिनेमानंतर दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे पुन्हा एक नवीन मराठी सिनेमा आणण्यासाठी सज्ज आहेत. ‘तुला कळणार नाही’ हा आगामी मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.विशेष म्हणजे ‘तुला कळणार नाही’ या सिनेमात अभिनेता सुबोध भावे प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. नुकतेच सोशल मीडियावर सिनेमाच्या नावाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.  यावेळी सिनेमाची निर्मिती अभिनेता स्वप्नील जोशी याने केली आहे.या सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा स्वप्ना वाघमारे आणि स्वप्निल जोशी यांची घट्ट मैत्री असल्याची बाब अधोरेखित झाले.स्वप्ना वाघमारेच्या सिनेमात स्वप्निल जोशीने मेहमी स्वप्नाला साथ दिल्याचे पाहायला मिळाल्या. त्यामुळे ‘तुला कळणार नाही’ सिनेमासाठी स्वप्निलने पुढाकर घेतला आहे.स्वप्ना आणि स्वप्निल 'मितवा' सिनेमा पासून ते फुगे सिनेमापर्यंत जी मैत्री मली ती अतुट मैत्री म्हणावी लागेल.आपल्या सिनेमातून प्रेमाची परिभाषा मांडणाऱ्या दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी आणि मराठीचा रॉमेंटिक हिरो स्वप्नील जोशी जेव्हा एकत्र येतात तेव्हा सिनेमा हिट झाले असेच समजा.दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे सविता दामोदर परांजपे या सिनेमाचेही दिग्दर्शन करत आहेत. विशेष म्हणजे सिनेमाला बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम प्रोड्युस करत आहे.सिनेमात खुद्द जॉन अब्राहम पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेतही झळकणार आहे.हा एक सायकोलोजिक थ्रिलर सिनेमा आहे.नुकताच सिनेमाचा मुहुर्तही करण्यात आला असून  सिनेमात सुबोध भावे, राकेश बापट आणि तृप्ती तोरडमल यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत.