सुबोध भावेने ऑनस्क्रीन मुलींसोबत साजरा केला फादर्स डे
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2017 16:24 IST
विक्रम फडणीस निर्मित आणि दिग्दर्शित ‘हृदयांतर’ चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. या चित्रपटात सुबोध भावे आणि मुक्ता बर्वे ...
सुबोध भावेने ऑनस्क्रीन मुलींसोबत साजरा केला फादर्स डे
विक्रम फडणीस निर्मित आणि दिग्दर्शित ‘हृदयांतर’ चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. या चित्रपटात सुबोध भावे आणि मुक्ता बर्वे मुख्य भूमिका साकारत आहेत आणि विशेष म्हणजे या चित्रपटात हृतिक रोशन प्रेक्षकांना पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहेत तर मनिष पॉल या चित्रपटात एका भूमिकेत दिसणार आहे.‘हृदयांतर’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये चित्रपटातली मुख्य व्यक्तिरेखा शेखर जोशी याच्याकडे कामाच्या व्यापामुळे आपल्या नित्या आणि नायशा या दोन मुलींसाठी वेळच नाहीये, हे आपल्याला पाहायला मिळाले होते.‘हृदयांतर’ सिनेमाद्वारे मुंबईसारख्या मोठ्या शहरात राहणाऱ्या आणि आपल्या करियरच्या मागे धावताना कामात व्यग्र असल्याने आपल्या मुलांना व्यवस्थित वेळ न देऊ शकणाऱ्या अनेक ‘शेखर जोशीं’ची कथा पाहायला मिळणार आहे. ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेता सुबोध भावेशी यासंदर्भात चर्चा केल्यावर त्याने सांगितले, “काहीही म्हणा, पण या सिनेमाच्या निमित्ताने दोन गोड मुलींचा बाप बनण्याची माझी इच्छा पूर्ण झाली. कोणीही पुन्हा पुन्हा त्यांच्या प्रेमात पडावे अशा या मुली आहेत. या दोन्ही मुली जेवढ्या लाघवी आहेत, तेवढ्याच समंजसही आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करणे नक्कीच सुखावह होते.”‘फादर्स डे’ निमित्ताने सुबोधने नुकतीच त्याच्या दोन्ही ऑनस्क्रीन मुलींना ट्रीट दिली. त्यावेळीही दोन्ही मुलींची सुबोधशी असलेली बॉन्डिग दिसत होती.यंगबेरी एन्टरटेन्मेट, इम्तियाज खत्री आणि विक्रम फडणीस प्रॉडक्शन आणि टोएब एन्टरटेन्मेट निर्मित ‘हृदयांतर’ चित्रपट ७ जुलै २०१७ रोजी प्रदर्शित होणाऱ आहे. या चित्रपटात मुक्ता आणि सुबोधसह सोनाली खरे मुख्य भूमिकेत आहे.