Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुबोध भावेला या कारणामुळे ओळखले नाही फॅन्सने

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 14:41 IST

सुबोध भावे गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत राहात असला तरी तो मुळचा पुण्याचा आहे. पुण्यात त्याचे सगळे बालपण गेले आहे. पुण्यातील गणेशोत्सव हा खूपच खास असतो. पुण्याच्या या गणेशोत्सवाचा आनंद सुबोधने अनेक वर्षं पुण्यात असताना घेतलेला आहे. यंदा देखील तो गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुण्यात असून त्याने पुण्यातील गणपतींचे दर्शन घेतले.

कोणत्याही सेलिब्रेटीला आपण सार्वजनिक ठिकाणी फिरावे, इतरांप्रमाणे आपण देखील सणांचा आनंद घ्यावा असे वाटत असते. पण लोकांनी ओळखले आणि गर्दी झाली तर... याची भीती अनेकांना वाटत असते. पण त्यातही अनेक सेलिब्रेटी कशाचीही पर्वा न करता आपल्या कुटुंबियांसोबत प्रत्येक क्षणाचा आस्वाद घेतात. सुबोध भावे गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत राहात असला तरी तो मुळचा पुण्याचा आहे. पुण्यात त्याचे सगळे बालपण गेले आहे. पुण्यातील गणेशोत्सव हा खूपच खास असतो. पुण्याच्या या गणेशोत्सवाचा आनंद सुबोधने अनेक वर्षं पुण्यात असताना घेतलेला आहे. यंदा देखील तो गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुण्यात असून त्याने पुण्यातील गणपतींचे दर्शन घेतले. त्यावेळी त्याच्यासोबत त्याची पत्नी आणि दोन्ही मुले देखील होते. सुबोधनेच इन्स्टाग्रामद्वारे ही गोष्ट त्याच्या चाहत्यांना सांगितली आहे. त्याने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत आपल्याला सुबोध, त्याची पत्नी आणि दोन्ही मुले पाहायला मिळत आहेत. या फोटोसोबतच सुबोधने पुणे, गणपतीदर्शन, फॅमिली, फनअनलिमिटेड, बाईक राईक यांसारखे हॅशटॅग दिले आहेत. यावरून त्याने पुण्यात बाईकवरून गणपतीदर्शन केले हे आपल्याला कळून येत आहे. पुण्याच्या रस्त्यावरून सुबोधने फिरताना त्याला कोणी ओळखू नये याची चांगलीच दक्षता देखील घेतली आहे. त्याने तोंडावर रुमाल बांधला असून कॅपदेखील घातली आहे. त्यामुळे त्याला कोणीही ओळखणे शक्य नाहीये. 

सुबोधच्या या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याच्या कुटुंबियांचा हा फोटो खूप छान असल्याचे त्यांनी प्रतिक्रियांद्वारे सांगितले आहे. या फोटोला आतापर्यंत ३० हजाराहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. 

झी मराठी या वाहिनीवर सध्या प्रेक्षकांना सुबोधची तुला पाहाते रे ही मालिका पाहायला मिळत आहे. या मालिकेतील त्याची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. त्याचा सविता दामोदर परांजपे हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच अभिनेते काशिनाथ घाणेकर यांच्या आयुष्यावर आधारित 'आणि...काशिनाथ घाणेकर' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा ७ नोव्हेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.  

टॅग्स :सुबोध भावे तुला पाहते रे