Join us

सिनेमाची कथा आहे सिनेमाचा 'हिरो'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2017 16:21 IST

पूर्वीच्या काळात लांब ढगळ झब्बा, खाकेत  झोळी  आणि डोळ्याला जाड चष्मा लावलेला माणूस दिसला की,एकतर हा कवी किंवा लेखक ...

पूर्वीच्या काळात लांब ढगळ झब्बा, खाकेत  झोळी  आणि डोळ्याला जाड चष्मा लावलेला माणूस दिसला की,एकतर हा कवी किंवा लेखक असल्याचे संबोधले जायचे.आता काळ बदलला आहे. वेगेवगळ्या माध्यमांच्या जगात याचे क्षितीजंही विस्तारू लागली आहेत. त्यामुळेच चित्रपट,मालिका, लघुपट, अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपले काम करत आपले अस्तित्व सिध्द करत आहेत.पण तरीही हा लेखकवर्ग आज खरंच समाधानी आहे का? आपले श्रेय दुसरे कोणीही घेतेय का?कधी कधी तर लेखकाची फसवणूक करत लेखकाने ऐकवलेली कथेत फेरफार करून एक नवा प्रोजेक्ट बनवला जातो अशा वेगवेगळ्या विषयांना हात घालणार एक होता लेखक हा सिनेमा भाष्य करतो.श्रीनाथ यांने सिनेमाचे दिग्दर्शन केले असून सुनील पाल मुख्य भूमिकेत झळकणार आहे. विशेष म्हणजे मुंबई जवळच्या छोट्या उपनगांमध्येच सिनेमाचे शूटिंग करण्यात आले आहे.सुनील पाल व्यतिरिक्त सिनेमात प्रसिध्द चेहरा नसला तरीही सिनेमाची कथाच सिनेमाची हिरो असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सिनेमातून मांडण्यात आलेली या लेखकाची गोष्ट रसकिांच्या काळजाला भिडणारी असून सिनेमा रसिकांच्या पसंतीस उतरेन अशी आशा व्यक्त केली जाच आहे. सिनेमाचे चित्रिकरण पूर्ण झाले असून सिनेमाच्या प्रदर्शनाची तारिख अद्याप ठरलेली नसून लवकरच सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती मिळतेय.आगामी काळात सुनील पालचे तीन मराठी सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहेत.'एकच निर्धार', 'एक होता लेखक' आणि 'फॅमिली 420'  अशी या तीन सिनेमांची नावं आहे. प्रत्येक सिनेमा वेगळा आणि या सिनेमाची कथा वेगळी असणार आहे.त्यामुळे रसिकांना या सिनेमातून सुनील पाल यांचं वेगळं रुप पाहायला मिळणार आहे. एक निर्धार हा सिनेमा सामाजिक विषयावर आधारित आहे. समाजातील घडामोडींवर या सिनेमात भाष्य करण्यात आलं आहे.या सिनेमात खुद्द सुनील पाल भूमिका तर साकारणार आहेत. याशिवाय सिनेमात सुनील पाल यांच्यासह प्रेमा किरण, मुश्ताक खान आणि इतर कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.