Join us
Daily Top 2Weekly Top 5

​​‘सैराट’ मधील याडं लावणाऱ्या गाण्याचा व्हिडीओ खास तुमच्यासाठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2016 21:00 IST

‘सैराट’ या आगामी मराठी सिनेमातील ‘याडं लागलं’ या गाण्याचा व्हिडीओ नुकताच लॉँच करण्यात आला आहे.

‘सैराट’ या आगामी मराठी सिनेमातील ‘याडं लागलं’ या गाण्याचा व्हिडीओ नुकताच लॉँच करण्यात आला आहे. या गाण्यात दिग्दर्शक नागराज मंजुळेंचीही एक छोटीसी झलक पाहायला मिळतेय. अजय अतुल यांच्या संगीताने सजलेली ‘सैराट’ मधील सर्व गाणी हॉलिवूडच्या सोनी स्टुडिओेत रेकॉर्ड करण्यात आली आहेत. अजय गोगावलेंनी या गाण्याला स्वरसाज चढवलाय. वारंवार ऐकावं आणि बघावं असं हे गाणं आहे. ‘याडं लागलं’ याचा सॉँग प्रोमो काही दिवसांपूर्वी शेअर करण्यात आला होता. मात्र आता पाच मिनीेट अठरा सेकंंदाचे संपूर्ण गाणे रिलीज करण्यात आले आहे. या गाण्यात प्रेमात पडलेल्या परशा आणि आर्चीच्या गुलाबी नात्यातील हळुवार क्षण दाखविण्यात आले आहेत.