Join us

Exclusive अक्कासाहेबांसाठी खास पैठणी केक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2016 17:39 IST

  प्रियांका लोंढे          कळल.... या एका शब्दाने सामोरच्याला गार करणाºया आक्कासाहेब आज घराघरात पोहचल्या आहेत. ...

  प्रियांका लोंढे          कळल.... या एका शब्दाने सामोरच्याला गार करणाºया आक्कासाहेब आज घराघरात पोहचल्या आहेत. बोलताना कडक वाटणाºया अक्कासाहेबांचा दरारा देखील तेवढाच आहे. बुट्ट्यांची भरजरी साडी, दागिन्यांनी मढलेल्या या अक्कासाहेबांचा नूकताच वाढदिवस साजरा करण्यात आला. अक्कासाहेबांची भुमिका साकारणाºया हर्षदा खानविलकर यांना त्यांच्या बर्थडेच्या दिवशी एक मस्त सरप्राईज देण्यात आले. कोणत्याही महिलांना आवडणारी गोष्ट म्हणजे साडी अन त्यातही पैठणी असेल तर मग विचारुच नका. मालिकेमध्ये सुंदर सुंदर साड्या घालणाºया अक्कासाहेबांना देखील पैठणीचा मोह आवरता आला नाही अन त्यांना देखील सरप्राईजमध्ये पैठणीच मिळाली. पण ही पैठणी वेगळ््या स्वरुपाची होती, म्हणजेच ही साडी नसुन तो एकदम यम्मी केक होता. हर्षदाला तिच्या बर्थडेला मिळालेला हा पैठणी केक ती नक्कीच विसरु शकणार नाही हे मात्र खरे.