Join us

सौरभ गोखलेचं आर्मी प्रेम,लष्कराच्या युनिफॉर्ममधील फोटो सोशल मीडियावर केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2019 19:00 IST

सौरभच्या या फोटोवर फॅन्सकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरू झाला आहे. आता या फोटोमागचं गुपित मात्र सौरभने उघड केलेले नाही. सौरभ एखाद्या चित्रपटात भारतीय लष्करी जवानाची भूमिका साकारणार आहे का हे पाहावं लागेल.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने हवाई स्ट्राईक करून बदला घेतला. यानंतर प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची भावना निर्माण झाली आहे. खासकरून भारतीय लष्कराच्या जवानांविषयीचे प्रेम साऱ्या देशात पाहायला मिळत आहे. आपण सुरक्षित राहावं यासाठी सीमेवर लढणाऱ्या प्रत्येक लष्कराच्या जवानाचा भारतीयांना अभिमान आहे. प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने भारतीय लष्कराच्या जवानांविषयीचं प्रेम व्यक्त करत आहे. अभिनेता सौरभ गोखलेचं भारतीय जवानांविषयी असलेले प्रेम सोशल मीडियावरील एका फोटोतून पाहायला मिळत आहे. या फोटोत सौरभने भारतीय लष्कराचा युनिफॉर्म परिधान केला आहे. हा युनिफॉर्म वेगळीच ऊर्जा निर्माण करतो असं कॅप्शन सौरभने या फोटोला दिली आहे. त्याच्या या फोटोवर फॅन्सकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरू झाला आहे. आता या फोटोमागचं गुपित मात्र सौरभने उघड केलेले नाही. सौरभ एखाद्या चित्रपटात भारतीय लष्करी जवानाची भूमिका साकारणार आहे का हे पाहावं लागेल.

छोटा पडदा असो किंवा मोठा पडदा अभिनेता म्हणजे सौरभ गोखलेने आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे. श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी या मालिकेतून छोट्या पडद्यावर एंट्री मारल्यापासून त्याने मागे वळून पाहिलेच नाही. विविध मालिकांमध्ये त्याने दर्जेदार भूमिका साकारल्या. यानंतर मराठी सिनेमा आणि रंगभूमीवरसुद्धा त्याने आपल्या अभिनयाची छाप पाडली. याच अभिनयाच्या ताकदीमुळे आता सौरभ हिंदी सिनेमातही काम करत आहे. बॉलिवूड अॅक्शनपटाचा दिग्दर्शक अशी ओळख असलेल्या रोहित शेट्टी यांच्या आगामी सिंबा सिनेमातही सौरभने भूमिका साकारली होती.  

टॅग्स :सौरभ गोखले