Join us

चीटरसाठी सोनु निगमने केले डबल रेकॉर्डींग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2016 12:41 IST

           सोनु निगमने आजवर बॉलीवुडमध्ये अनेक वेगवेगळ््या प्रकारची गाणी गाऊन त्याच्या आवाजाने पॅेक्षकांना मोहिनी घातली ...

           सोनु निगमने आजवर बॉलीवुडमध्ये अनेक वेगवेगळ््या प्रकारची गाणी गाऊन त्याच्या आवाजाने पॅेक्षकांना मोहिनी घातली आहे. कोणत्याही प्रकारचे गाणे अगदी सहजतेने गाणाºया या सिंगरने आता मराठी चीटर या सिनेमासाठी पार्श्वगायन केले आहे. सोनु निगमने पुजा सावंत अन वैभव तत्ववादी यांच्यावर चित्रीत करण्यात आलेले मन माझे हे रामँटिक गाणे गायले आहे. हे गाणे त्याने एकदा नाही तर तब्बल दोन वेळेस गायले आहे. आता सोनु निगम सारख्या सिंगरला जर एकच गाणे दोनदा गायले लागले असे ऐकल्यावर प्रेक्षकांच्या भुवया तर उंचावल्याच असतील. त्या गाण्यात असे काय आहे की सोनुला ते एकदा गायला जमले नाही अशाप्रकारचे प्रश्न जर पडत असतील तर जरा थांबा. सोनुने गायलेले गाणे हे अतिशय उत्कृष्ठ होते. परंतू जेव्हा सोनुने ते गाणे पाहिले तेव्हा त्याला वाटले आपण हे अजुन जास्त चांगले गाऊ शकतो अन त्याने ते पुन्हा रेकॉर्डिंग केले. हे जेव्हा वैभव तत्ववादीला समजले तेव्हा तो थोडासा घाबरला त्याला वाटले की आपण चांगले एक्सप्रेशन दिले नाही म्हणुनच सोनुला हे गाणे डबल गावे लागत आहे. परंतू त्याचे खरे कारण असे होते की या गाण्यात वैभवने केलेले लिप्सिंग जेव्हा सोनुने पाहिले तेव्हा त्याने वैभवच्या लिप्सिंगला मॅच करता यावे यासाठी डबल गाणे गायले. क्या बात है सोनु, याला म्हणतात डाऊन टु अर्थ सिंगर.