Join us

गीतध्वनीमुद्रणाने कॉपी चित्रपटाचा मुहूर्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2016 12:46 IST

हेमंत धबडे आणि दयासागर वानखेडे  दिग्दर्शित कॉपी या चित्रपटाचा नुकताच मुहूर्त पार पडला.या आगामी मराठी चित्रपटाचा मुहूर्त गीतध्वनीमुद्रणाने करण्यात ...

हेमंत धबडे आणि दयासागर वानखेडे  दिग्दर्शित कॉपी या चित्रपटाचा नुकताच मुहूर्त पार पडला.या आगामी मराठी चित्रपटाचा मुहूर्त गीतध्वनीमुद्रणाने करण्यात आला. गायक प्रविण दोणे यांनी गायलेलं चालला चालला जीक पांघरूनिया... हे गीत रेकॉर्ड करण्यात आलं. यावेळी अभिनेते विजय पाटकर उपस्थित होते. तसेच राहुल साळवे यांनी लिहिलेल्या या गीताला रोहन प्रधान-रोहन गोखले या संगीतकार जोडीने संगीत दिलं आहे. या चित्रपटाची निर्मिती  गणेश पाटील आणि शंकर म्हात्रे यांनी केली आहे. या चित्रपटात अंशुमन विचारे, जगन्नाथ निकंगुणे, विपुल साळुंखे आदि कलाकारांचा समावेश आहे. कॉपी हा चित्रपट समाजातील समाजातील शिक्षण व्यवस्थेकर भाष्य करणारा आहे. तसेच समाजातील विशेषत: ग्रामीण भागात झालेल्या शिक्षणाच्या बाजारीकरणाला काचा फोडणारा आहे. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या मानसिकतेचा आढावा कॉपी या चित्रपटाच्या निमित्ताने घेण्यात येणार आहे. आज समाजात जे घडतंय ते दाखविण्याचा प्रयत्न या चित्रपटात केला जाणार आहे.