Join us
Daily Top 2Weekly Top 5

'या' व्यक्तिकडून आर्याला मिळाले संगीतातले धडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2018 10:44 IST

आतापर्यंत अनेक कलाकारांनी या इंडस्ट्रीत गायक म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांनी अभिनयात पदार्पण केले. काही गायक-गायिका ...

आतापर्यंत अनेक कलाकारांनी या इंडस्ट्रीत गायक म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांनी अभिनयात पदार्पण केले. काही गायक-गायिका म्युझिक व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या भेटीला आले. आपल्या आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या आर्या आंबेकरने ही गायिका म्हणून या क्षेत्रात पदार्पण केले होते. आर्या पहिल्यांदा आपल्याला सारेगमप लिटिल चॅम्प्स' या पर्वात दिसली होती. आपल्या गोड आवाजाच्या जोरावार आर्याने रसिकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले. लिटिल चॅम्प्सच्या महाअंतिम फेरीतदेखील आर्याने धडक मारली. आर्याला गायनाचे बाळकडू तिच्या घरातूनच मिळाले. आर्याने वयाच्या साडेपाच वर्षांपासून गायनाचे धडे गिरवायला सुरुवात केली. आर्याची आजीसुद्धा गायिका आहेत. आर्याने आतापर्यंत अनेक सिनेमा आणि नाटकांसाठी गाणी गायली आहेत. आर्याला गतवर्षी विदया प्रज्ञा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आर्याने गाण्यासोबत कथ्थकचे देखील धडे घेतले आहे. काही महिन्यांपूर्वी अवधूत गुप्तेने देखील आर्याचे कौतुक केले होते. आर्यासोबतचा फोटो शेअर करत मला तुझा अभिमान आहे असे त्याला कॅप्शन दिले होते. आर्याने अभिनय बेर्डेसोबत सिनेमात पदार्पण केले. शिवाय अलीकडेच आर्याचा 'अलवार मन हे माझे' नावाचा व्हिडिओ अल्बमही रिलीज झाला. ती सध्या काय करते चित्रपटात आर्या झळकली होती. पहिल्या प्रेमाची आठवण करून देणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटात अंकुश चौधरी, तेजश्री प्रधान, उर्मिला कानेटकर-कोठारे या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटामुळे अभिनय बेर्डे आणि आर्या आंबेकर हे दोन नवे चेहरे मराठी इंडस्ट्रीला मिळालेले आहेत. अंकुश आणि तेजश्रीच्या किशोर अवस्थेतील भूमिका आर्या आणि अभिनयने साकारली होती.