Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘झिलमिल’ हे नवे गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 18:24 IST

व्हिडिओ पॅलेसचा आगामी म्युझिक व्हिडिओ ‘झिलमिल’चे टीझर पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर लाँच करण्यातआले आहे.

 ‘बेखबर कशी तू’ या रोमँटिक गाण्याने सर्वांना पुन्हा एकदा प्रेमाचे वेड लावणाऱ्या व्हिडिओ पॅलेसने ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी एक नवीन म्युझिक व्हिडिओ प्रेक्षकांसाठी आणण्याचा बेत आखला आहे. सेलिब्रेशन उत्साहाने झाले पाहिजे या हेतूने व्हिडिओ पॅलेसचा आगामी म्युझिक व्हिडिओ ‘झिलमिल’चे टीझर पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर लाँच करण्यातआले आहे.व्हिडिओ पॅलेस त्यांच्या प्रत्येक म्युझिक व्हि़डिओमधून हटके, इंटरेस्टिंग आणि रॉकिंग देण्याचा प्रयत्न करतात. मग ते गायक असो, कलाकारांची जोडी असो किंवा लोकेशन्स. पण व्हिडिओ पॅलेसने प्रत्येकवेळी काहीतरी नवीन प्रेझेंट करावे हा त्यांचा मुख्य हेतू असतो. त्यामुळे ‘बेखबर कशी तू’ या गाण्याला प्रेक्षकांनी मनापासून दाद दिल्यावर, प्रेक्षकांसाठी आणखी एक खास भेटम्हणून ‘झिलमिल’ हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.गुझबम्प्स एंटरटेनमेंट आणि व्हिडीयो पॅलेस प्रस्तुत ‘झिलमिल’ या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे लोकेशन्स. ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न आणि सिडनीच्या नयनरम्य ठिकाणी या गाण्याचे शूट झाले आहे.  हल्ली मराठी चित्रपट, गाणी यांचे शूटिंग परदेशात होऊ लागल्यामुळे प्रत्येक मराठी प्रेक्षकांसाठी ही अभिमानाची बाब आहे. आपल्या वातावरणाने आणि सुंदर देखाव्यामुळे अनेकांनाभुरळ पाडणाऱ्या या लोकेशन्सवर या गाण्याचे शूट झाले असून या गाण्याच्या टीझर पोस्टरवर दिसणारा अभिनेता नेमका कोण आहे, असा प्रश्न अनेकांना नक्की पडला असेल. तसेच ‘गेट ऑन दी बीट’ हे कॅप्शन असे सुचविते की हे डांसिंग नंबर आहे जे प्रेक्षकांना आपल्या बीटवर थिरकायला भाग पाडतील.