Join us
Daily Top 2Weekly Top 5

​सोना मोहपात्राने गायले 'घाट'साठी गाणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 16:04 IST

‘टाटा सॅाल्ट कल का भारत है’ आणि ‘क्लोज अप पास आओ ना’ या प्रसिद्ध जिंगल्स तसेच ‘दिल्लीबेल्ली, फुक्रे’, ‘हंटर’, ...

‘टाटा सॅाल्ट कल का भारत है’ आणि ‘क्लोज अप पास आओ ना’ या प्रसिद्ध जिंगल्स तसेच ‘दिल्लीबेल्ली, फुक्रे’, ‘हंटर’, ‘रामण राघव २.०’ यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटातील गीतांना स्वरसाज देणारी गायिका सोना मोहपात्रा आता मराठी चित्रपटात गाताना दिसणार आहे. तिने एका मराठी चित्रपटासाठी नुकतेच रेकॉर्डिंग देखील केले आहे. घाट हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटातील एक भक्तीमय गीत ती गाणार आहे. घाट या मराठी सिनेमातील भक्तीमय गीत नुकतेच सोना मोहपात्राने स्वरबद्ध केले. मराठी गाणे गाण्याचा तिचा अनुभव खूपच चांगला होता. घाट चित्रपटाची निर्मिती सचिन जरे यांची असून दिग्दर्शन राज गोरडे यांचे आहे. एका वेगळ्या विषयाला स्पर्श करणारा घाट हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.घाट या चित्रपटासाठी तिने गायलेल्या भक्तीमय गाण्याचे बोल पुढीलप्रमाणे आहेत...घुमला गजर आभाळीज्ञानराज माझी माऊलीज्ञानोबा माऊली चित्त तुझ्या पावलीज्ञानोबा माऊली चंदनाची सावलीअसे बोल असलेले हे गीत वैभव देशमुख यांनी लिहिले असून रोहित नागभिडे यांनी संगीतबद्ध केले आहे. माझ्या मनाला स्पर्शून गेलेले हे भावगीत प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेईल असा विश्वास व्यक्त करताना मराठीत गाण्याचा अनुभव माझ्यासाठी नेहमीच चांगला राहिला असल्याचे ही सोना मोहपात्राने आवर्जून सांगितले. या गाण्याच्या निमित्ताने गायिका सोना मोहपात्रासोबत काम करायला मिळाल्याचा आनंद व्यक्त करताना माऊलीचा हा गजर म्हणजे माऊलीची सेवाच असल्याचे मत संगीतकार रोहित नागभिडेने व्यक्त केले.आयुष्याची अनाकलनीय आव्हाने आणि घटनांकडे किती वेगवेगळ्या बाजूने बघता येते याचा वेध घाट चित्रपटातून घेण्यात आला आहे. या चित्रपटाच्या नावावरूनच या चित्रपटात प्रेक्षकांना एक वेगळी कथा पाहायला मिळणार असल्याचे कळत आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद राज गोरडे यांचे आहेत तर या चित्रपटाचे छायांकन अमोल गोळे तर संकलन सागर वंजारी यांचे आहे. या चित्रपटाचे प्रोडक्शन मॅनेजर विनायक पाटील आहेत. Also Read : सोना मोहपात्रा चर्चेत आहे! कारण काय तर, कंगना राणौतची ‘सर्कस’!!