Join us

विश्वास चित्रपटाचे गीतध्वनीमुद्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2016 15:33 IST

        विश्वास या मराठी सिनेमातील चार गीतांचे गीतध्वनीमुद्रण नुकतंच करण्यात आलं.  रविंद्र साठे, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर, ...

 

 

      विश्वास या मराठी सिनेमातील चार गीतांचे गीतध्वनीमुद्रण नुकतंच करण्यात आलं.  रविंद्र साठे, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर, जान्हवी प्रभू अरोरा, वैशाली माडे, रोहित राउत या दिग्गजांच्या आवाजातील गाणी व नंदू होनप याचं संगीत हे विश्वास चित्रपटाचे एक वैशिष्ट्य ठरावे. या चित्रपटाच्या सर्व गीतरचना रूपा कुलकर्णी यांच्या आहेत.

 

रविंद्र साठे यांनी या चित्रपटातील ‘नशीबाची थट्टा झाली, डाव संपला’ हे विरह गीत गायलं आहे. तर ‘माथ्यावरचे  कुंकु तू जपशील का’? हे  दुसरं गीत वैशाली माडे यांनी रोहित राऊत यांच्या साथीने स्वरबद्ध केलं आहे. आपल्या मधाळ आवाजाने अनेक हिट गाणी देणाऱ्या वैशाली सामंत यांनी यातील ‘पोपट पिसाटला’ हे आयटम सॉंग  गायलं आहे. ‘तुझ्या माझ्या प्रीतीच झेपावलं पाखरू’ हे प्रेमगीत जान्हवी प्रभू अरोरा व स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित करण्यात आलं आहे.