सोनालीचे स्वप्न पूर्ण झाले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2016 11:48 IST
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नुकत्याच एका चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. या चित्रपटामुळे सोनालीचे एक स्वप्न पूर्ण झाले आहे. सोनाली ...
सोनालीचे स्वप्न पूर्ण झाले
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नुकत्याच एका चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. या चित्रपटामुळे सोनालीचे एक स्वप्न पूर्ण झाले आहे. सोनाली आणि अभिनेता पुष्कर श्रोती या चित्रपटात एकत्र काम करत आहेत. पुष्कर हा सोनालीचा अतिशय आवडता अभिनेता आहे. त्यामुळे त्याच्यासोबत काम करण्याचा तिला प्रचंड आनंद होत असल्याचे ती सांगते. पुष्करसोबत काम करावे असे सोनालीचे स्वप्न होते. या नव्या चित्रपटामुळे तिचे हे स्वप्न पूर्ण झाले आहे.