सोनाली खरे इज बॅक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 10:38 IST
एस....सोनाली खरे कोण हा प्रश्न नक्कीच पडला असेलच तुम्हाला तर थांबा. आणि ऐका, काही वर्ष मागे जावा,तरूणांचा आवडता चित्रपट ...
सोनाली खरे इज बॅक
एस....सोनाली खरे कोण हा प्रश्न नक्कीच पडला असेलच तुम्हाला तर थांबा. आणि ऐका, काही वर्ष मागे जावा,तरूणांचा आवडता चित्रपट असणारा सावरखेड एक गाव हा मराठी चित्रपट आठवतो ना, येस याच चित्रपटात श्रेयस तळपदे, अकुंश चौधरी या स्टार कास्टसोबत सोनाली खरे हा सुंदर चेहरा दिसला होता. आता, हाच सुंदर चेहरा लवकरच एका मराठी चित्रपटातून पुन्हा पदार्पण करत आहे. तसेच सोनालीने यापूर्वी प्यार के दो नाम एक राधा-एक श्याम,हम जो कह ना पाऐ, तेरे लिए अशा अनेक हिंदी सिरियलमधून काम केले आहे. तसेच बे दुणे चार, चेकमेंट या मराठी चित्रपटातूनदेखील ती झळकली होती. आता, पुन्हा सोनाली एका मोठया गॅपनंतर मराठी चित्रपटात चमकणार आहे. तर चला सोनालीला, तिच्या पुर्नगमनासाठी तसेच चित्रपटासाठी शुभेच्छा देउयात.