फॉलोअर्सच्या संख्येमुळे सोनाली कुलकर्णी का भारावली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2017 11:01 IST
‘अप्सरा आली’ म्हणत रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर चांगलीच एक्टिव्ह असते. सोशल नेटवर्किंग साईट ...
फॉलोअर्सच्या संख्येमुळे सोनाली कुलकर्णी का भारावली?
‘अप्सरा आली’ म्हणत रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर चांगलीच एक्टिव्ह असते. सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते. नुकतेच ट्विटरवरील सोनालीच्या फॉलोअर्सची संख्या 40 हजारावर गेली आहे. रसिकांचं एवढं प्रेम पाहून सोनाली कुलकर्णी भारावून गेली आहे. फॉलोअर्सचा हा टप्पा पार केल्यानंतर फॅन्सकडूनही तिच्यावर अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. फॅन्सना आपल्या लाडक्या कलाकारांशी आणि कलाकारांना त्यांना आपल्या फॅन्सशी थेट संवाद साधायला आवडतो. याकरिता त्यांच्यासाठी उत्तम माध्यम ठरतं आहे ते सोशल नेटवर्किंग साईट्स. ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून सेलिब्रिटी आणि फॅन्स यांना एकमेकांशी थेट संवाद साधणं अगदी सुलभ झालंय. त्यामुळे अनेक सेलिब्रिटींना ट्विटरच्या माध्यमातून थेट रसिकांशी जोडले गेले आहेत. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने हजारो मराठी फॅन्सच्या काळजाचा ठाव घेणारी 'नटरंग' सिनेमातील अप्सरा फेम सोनाली कुलकर्णीसुद्धा ट्विटरवर फॅन्सशी संवाद साधत असते. काही महिन्यांपूर्वी तिच्या ट्विटर हँडलसमोर निळ्या रंगाची बरोबरची खूण प्रसिद्ध झाली होती. कारण सोनाली कुलकर्णीच्या नावाने ट्विटरवर 5 हजाराहून अधिक अकाऊंट असून त्यातील बहुतांशी भारतातले आहेत. त्यामुळे सगळ्यांची खातरजमा करुन ट्विटरने काही महिन्यांपूर्वी @mesonalee हे सोनाली कुलकर्णीचे ट्विटर अधिकृत असल्याचे जाहीर केले होते. यानंतर आपल्या लाडक्या अभिनेत्रीशी थेट संवाद साधण्यासाठी सोनालीच्या या ट्विटर हँडलवरील फँन्सची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. आता तर फॉलोअर्सच्या संख्या चाळीस हजाराच्यावर गेल्यानं फॅन्स आणि तिच्या सहका-यांकडून सोनालीवर शुभेच्छांचा वर्षावर सुरु झाला आहे.