Join us

'तुझ्या मिठीत आणि निर्सगाच्या कुशीत...', अप्सरा सोनाली कुलकर्णीने पतीसोबत शेअर केला रोमाँटिक फोटो पाहिलात का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 18:58 IST

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee kulkarni) नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी लंडनला गेली आहे.

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee kulkarni) नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी लंडनला गेली आहे. सोनालीने लंडन एअरपोर्टवरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. सोनाली(Sonalee kulkarni)च्या पत्नीने तिचं एअरपोर्टवर स्वागत केलं होतं. सोनालीने पती कुणाल बेनोडेकरसोबतचे रोमाँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोत सोनाली पती कुणाला मिठीत दिसते. या फोटोला सोनालीने कॅप्शन देत लिहिले, 2021चा शेवट तुझ्या मिठीत आणि निर्सगाच्या कुशीत. सोनालीच्या या फोटोवर सेलिब्रेटींसह चाहत्यांनी ही लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. 

सोनाली कुणालसोबतचे फोटो सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असते. मे महिन्यात सोनालीने कुणाल बेनोडेकरसोबत दुबईत लग्नगाठ बंधली. कुणालचं शिक्षणही लंडनमधल्या 'मर्चंट्स टेलर स्कूल'मध्ये झालं आहे.त्यानंतर 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पोलिटिकल सायन्स'मधून त्याने उच्च शिक्षण देखील घेतलं.

लग्नानंतर सोनालीनं दमदार कमबॅक केलंय. सोनालीचा ‘झिम्मा’ आणि ‘पांडू’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आले. सोनाली कुलकर्णीने 'बकुळा नामदेव घोटाळे' या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. तिने मराठीत एकाहून एक हिट चित्रपट दिले असून हिंदी चित्रपटातही तिने काम केले आहे. 'छत्रपती ताराराणी' आणि फ्रेश लाईम सोडा हे दोन सिनेमे सुद्धा सोनालीनं साईन केलेत..

टॅग्स :सोनाली कुलकर्णीमराठी