Join us

सोनालीचं साडीमधलं ब्लॅक अँड व्हाईट फोटोशूट पाहिलंत का ?, चाहत्यांसह सेलिब्रेटींनीही केला कमेंट्सचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2021 18:21 IST

सोनालीने साडीतले फोटोशूट शेअर करत सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

सोनाली कुलकर्णी तिच्या सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यामतून ती आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते आणि चाहत्यांशी संवाद साधत असते. यावेळी मात्र सोनालीने साडीतले फोटोशूट शेअर करत सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. विशेष म्हणजे सोनालीने हे फोटोशूट ब्लॅक अँड व्हाईटमध्ये केलं आहे. 'कृष्णधवल' असे या फोटोंना कॅप्शन सोनालीने दिलं आहे. सेलिब्रेटींसह सोनालीचे चाहत्यांनी या फोटोशूटवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. सोनालीचं सोज्वळ सौंदर्य यात खुलून आलं आहे.  

अप्सरा आली म्हणत तिने मराठी रसिकांवर जादू केली आहे. विविध सिनेमातून वेगवेगळ्या भूमिका साकारत सोनालीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. सोनाली कुलकर्णी ‘डान्सिंग क्वीन साईज लार्ज-फुललार्ज’ या डान्स रिअ‍ॅलिटी शोमध्ये परिक्षक म्हणून आहे. याच शोमध्ये सोनालीने मराठी कार्यक्रमांममध्ये हिंदी गाण्यांवर नृत्य न करण्याचा तिचा निर्णय जगजाहिर केला. 

बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत तिने पदार्पण केले होते. लवकरच ती थ्री चिअर्स टू'सिनेमामध्ये हेमंत ढोमे आणि संतोष जुवेकरसोबत दिसणार आहे . लोकेश विजय गुप्ते या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत.

टॅग्स :सोनाली कुलकर्णी