Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोनाली कुलकर्णीच्या स्टायलिश फोटोची सोशल मीडियावर चर्चा, पाहा तिचा हा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 17:30 IST

सोनाली कुलकर्णीने आज तिच्या मेहनतीने मराठी चित्रपटसृष्टीत तिचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

सोनाली कुलकर्णीने आज तिच्या मेहनतीने मराठी चित्रपटसृष्टीत तिचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिने बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. तिने मराठीत एकाहून एक हिट चित्रपट दिले असून हिंदी चित्रपटातही तिने काम केले आहे.

सोनाली कुलकर्णी नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यामातून तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते. तिच्या चित्रपटाचे चित्रीकरण कुठे सुरू आहे. ती चित्रीकरणातून वेळ काढून कुठे व्हेकेशनला गेली आहे या प्रत्येक गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या फॅन्सना सांगत असते.

त्यामुळे तिला मोठ्या संख्येने तिचे चाहते मोठ्या प्रमाणावर फॉलो करतात. सोनालीने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात तिने मरुन रंगाचा स्कर्ट-टॉप घातला आहे. सोनालीच्या फॅन्सनासुद्धा तिचा हा अंदाज चांगलाच भावला आहे. तिच्या फोटोवर फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलायं.

सोनालीच्या करिअरबाबत बोलायचे झाले तर तिने अंजिठा, पोस्टर गर्ल, झपाटलेला २, मितवा, क्लासमेट यांसारख्या चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. बकुळा नामदेव घोटाळे या तिच्या पहिल्या चित्रपटासाठी तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले होते.

टॅग्स :सोनाली कुलकर्णी