सोनाक्षी-स्मिता येणार एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2017 15:17 IST
स्मिता तांबेने अनेक मराठी चित्रपटांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारुन आपल्या अभिनयाची मोहोर मराठी चित्रपटसृष्टीत उमटविलीच आहे. स्त्रीप्रधान भूमिका साकारताना आपण ...
सोनाक्षी-स्मिता येणार एकत्र
स्मिता तांबेने अनेक मराठी चित्रपटांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारुन आपल्या अभिनयाची मोहोर मराठी चित्रपटसृष्टीत उमटविलीच आहे. स्त्रीप्रधान भूमिका साकारताना आपण स्मिताला पाहिलेच आहे. स्मिता आता सोनाक्षी सिन्हा सोबत एका चित्रपटात झळकणार असल्याचे कळतेय. स्मिताचा हा काही पहिलाच हिंदी चित्रपट असणार नाहीये. स्मिता याआधी देखील अजय देवगन सोबत झळकली होती. आता तिचा सोनाक्षी सोबत एक हिंदी चित्रपट येत आहे. नूर या चित्रपटातून सोनाक्षी आणि स्मिता प्रथमच आमने-सामने येणार आहेत. नूर या चित्रपटामध्ये सोनाक्षीची एकदम डॅशिंग भूमिका आपल्याला पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपुर्वीच सोनाक्षीने या चित्रपटाचे पोस्टर रिलिज केले होते. या सिनेमात आपल्याला ही दबंग गर्ल पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. तर स्मिता देखील एका महत्वपूर्ण भूमिकेत असल्याचे खुदद स्मिता तांबेने लोकमत सीएनएक्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. सोनाक्षी सेटवर अतिशय शांत असते. ती तिचे काम अगदी चोख करते. तर तिला स्टारडमचा अजिबातच गर्व नाही. सोनाक्षी सोबत माझे अनेक सीन्स आहेत. तिच्यासोबत काम करताना आणि स्क्रीन शेअर करताना मला नक्कीच आनंद होत आहे. असेही स्मिताने सांगितले. आता हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच आपल्याला सोनाक्षी आणि स्मिताची पडदयावरची केमिस्ट्री दिसणार आहे. सोनाक्षीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोवर नूर या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख लिहण्यात आली आहे. सोबतच सोनाक्षीने या फोटोला कॅप्शन देताना लिहलेय, ती सूर्यप्रकाशासारखी आहे, मात्र तिच्यात वादळ आहे, ती साधेपणापासून दूर आहे, पण ती खास नाही, ती प्रत्येक मुलगी आहे. ती नूर आहे, मी नूर आहे, ती लवकरच येतेय . सोनाक्षीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचे अनेक अनेक रुपे दिसतात.