Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोनाक्षीने केली प्रियांकाची तारीफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2016 15:35 IST

         दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाने नुकतीच सोशल साईट्सवर गायिका आणि अभिनेत्री प्रियांका बर्वेची मनसोक्त स्तुती केली ...

         दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाने नुकतीच सोशल साईट्सवर गायिका आणि अभिनेत्री प्रियांका बर्वेची मनसोक्त स्तुती केली आहे. आता तुम्ही म्हणाल की सोनाक्षीने प्रियांकाचे कौतुक का बरे केले. प्रियांका कोणत्या हिंदी चित्रपटात तर झळकणार नाही ना? असे प्रश्न जर तुम्हाला पडले असतील तर जरा थांबा. तसेच बिलकुलच काही नाहीये. प्रियांकाचे सध्या मुगल ए आझम हे सांगितीक नाटक सुरु आहे. या नाटकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळतोय.  एवढेच काय तर चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलाकारांनी देखील हे नाटक पाहण्यासाठी हजेरी लावली होती. नुकतीच सोनाक्षी या नाटकाच्या प्रयोगला उपस्थित होती. नाटक संपल्यावर सोनाक्षी प्रियांकाला येऊन भेटली आणि तिच्या अभिनयाचे तिने कौतूक केले एवढेच नाही तर तू अनारकलीची भूमिका छान साकारली आहेस असे सांगायलाही ती विसरली नाही. सोनाक्षीने प्रियांकासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि मुगल ए आझम हे नाटक सर्वांनी आवर्जून पाहण्याचेदेखील सांगायला विसरली नाही. याबाबत प्रियांकाने लोकमत सीएनएक्सशी संवाद साधताना सांगितले, सोनक्षीची आई पूनम सिन्हा या पहिल्यांदा हे नाटक पाहण्यासाठी आल्या होत्या. त्याना ते नाटक एवढे आवडले की त्या सोनाक्षी आणि शत्रुघ्न सिन्हा या दोघांनाही घेऊन पुन्हा प्रयोगला आल्या. नाटक संपल्यानंतर हे तिघेही मला भेटायला आले. सोनाक्षीने माझे मनापासून कौतुक केले. तिचे शब्द अजूनही माझ्या डोक्यात आहेत. तिने केलेली स्तुती मी विसरुच शकत नाही असे प्रियांका म्हणालीय.