Join us

गायक अरूण दातेंचे पुत्र संगीत यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2016 13:21 IST

ज्येष्ठ गायक अरूण दाते यांचा धाकटा मुलगा संगीत दाते यांनी सायन येथील महानगरपालिकेच्या रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर तिथे उपचार सुरू होते. संगीत दाते यांच्या नशिबी आलेले रस्त्यावरील जीणं यावर ‘लोकमत’ने सर्व प्रथम प्रकाश टाकला होता.

ज्येष्ठ गायक अरूण दाते यांचा धाकटा मुलगा संगीत दाते यांनी सायन येथील महानगरपालिकेच्या रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर तिथे उपचार सुरू होते. संगीत दाते यांच्या नशिबी आलेले रस्त्यावरील जीणं यावर ‘लोकमत’ने सर्व प्रथम प्रकाश टाकला होता. त्यानंतर हिंजवडी पोलिसांनी संगीत यांना उपचारासाठी तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले होते. विविध क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे केले. काही दिवसांपूर्वी त्यांना उपचारांसाठी सायन रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र उपचारांदरम्यान आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करण्यास शिकवणारे अरुण दाते यांच्या संगीत या मुलाला कोणीतरी वाकडच्या पुलाजवळ सोडले होते. पत्नीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर आणि कुटुंबियांने झिडकारल्याने त्यांच्यावर भीक मागण्याची वेळ आली होती. त्यांना अनेक व्याधींनीदेखील ग्रासले होते. तसेच अर्धांगवायूचा झटकादेखील झाला होता.