Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘तुफान आलं’ या व्हिडीयोतून सामाजिक संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2017 15:24 IST

२०१२ मध्ये सुरू झालेलं आमीर खानचं ‘सत्यमेव जयते’ आता पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येण्यासाठी सज्ज झालं आहे. आमीर खान, किरण ...

२०१२ मध्ये सुरू झालेलं आमीर खानचं ‘सत्यमेव जयते’ आता पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येण्यासाठी सज्ज झालं आहे. आमीर खान, किरण राव आणि सत्यजीत भटकळ यांनी पुन्हा एकदा कंबर कसली आहे. पण यावेळी एक आगळ्या वेगळ्या कल्पनेने याची सुरुवात केली आहे. कल्पना म्हणजे त्या गाण्याचा व्हिडीयो तयार केला आहे, ज्यामध्ये पाणी या विषयावर लक्ष केंद्रित केलं आहे. पण गाणं करायचं म्हटलं तेव्हा खुद्द आमीर खानने गुरू ठाकूरचं नाव घेतलं कारण मराठीत गाणं येणार म्हणजे त्याला तसा साज देखील आलं पाहिजे. ‘तुफान आलं’ हे या गाण्याचे नाव असून या ५ मिनिटांच्या गाण्यामध्ये आमिर खानसह आपल्या मराठी सिनेसृष्टीतील कलाकार नागराज मंजुळे, रिंकू राजगुरु, आकाश ठोसर, अजय-अतुल, सुनील बर्वे, सई ताम्हणकर, जितेंद्र जोशी आदी कलाकार विशेष भूमिका निभावताना दिसणार आहे. विशेष म्हणजे या व्हिडीयोचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले असून अजय यांच्यासह किरण राव यांनी पण या गाण्याला आवाज दिला आहे.  पाणी फाऊंडेशच्या तुफान आलं या गाण्याच्या संगीताची जबाबदारी अजय-अतुल यांनी उत्तमरित्या पार पाडली आहे.या गाण्यातून या सर्व कलाकारांना कोणता संदेश पोहचवायचा आहे आणि हा संदेश सध्याच्या परिस्थितीत आणि भविष्यात किती मौल्याचा ठरणार आहे हे तुम्हांला कळेल-