म्हणून सिध्दार्थ चांदेकर ठरतोय सेल्फी किंग!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2017 15:20 IST
Selfie Le Le Re म्हणत सलमान खानने रूपेरी पडदा गाजवला, त्यानंतर सेल्फी घेण्याचा ट्रेंड असा काही जोर धरू लागला ...
म्हणून सिध्दार्थ चांदेकर ठरतोय सेल्फी किंग!
Selfie Le Le Re म्हणत सलमान खानने रूपेरी पडदा गाजवला, त्यानंतर सेल्फी घेण्याचा ट्रेंड असा काही जोर धरू लागला की त्यानंतर प्रत्येकजण आपापल्या फोनच्या माध्यमातून सेल्फी काढताना दिसू लागले. सेल्फी क्लिक करण्याचा ट्रेंड इन झाला.सेल्फी घेण्यात आपले सेलिब्रेटीही मागे नाहीयेत. सिनेमाच्या शूटिंगमधून वेळ मिळताच कलाकार मंडळी त्यांचे फनी मोमेंट, हँप्पी मोमेंट त्याच्या मोबाईल फोनमध्ये कैद करताना दिसतात. आपले सेल्फी कालाकारांच्या चाहत्यांपर्यंतही पोहचावेत यासाठी सोशल मीडियावर लगेच सेल्फी अपलोड करत चाहत्यांकडून वाहवा मिळवताना दिसतात. सध्या मराठी इंडस्ट्रीत हँडसम हंक समजला जाणारा अभिनेता सिद्धार्थ चांदेकरही त्याच्या सेल्फीमुळेच खूप चर्चेत आला आहे. होय, सिध्दार्थ जिथे जातो तिथे सेल्फी क्लिक करत असतो. त्यामुळे आता त्याला सेल्फीकिंग म्हणूनही ओळखले जाऊ लागले आहे. त्याच्या फेसबुक पेजवरही सगळ्यात जास्त त्याचेचे सेल्फी क्लिक्स पाहायला मिळतायेत. कधी सहकलाकरांसह तर कधी त्याच्या नवीन लुकमध्ये तो सेल्फी काढत असल्याचे पाहायला मिळतं.वेगवगळ्या मुडमधले सेल्फी सिध्दार्थ क्लिक करत असतो. त्यामुळे आता मराठी इंडस्ट्रीतही सिध्दार्थची सेल्फी किंग अशी ओळख बनली आहे.विशेष म्हणजे सिध्दार्थने सोशल मीडियावर शेअर केेलेल्या प्रत्येक सेल्फीला त्याच्या चाहत्यांकडून भरभरून प्रतिक्रीयाही मिळत असतात. सिध्दार्थने झेंडा,क्लासमेट्स,ऑनलाईन बिनलाईन, वजनदार, असे वेगवेगळ्या सिनेमातून रसिकांची मनं जिंकली आहे.अभिनयाची आवड असलेल्या सिद्धार्थला सेल्फीचे हि खूप वेड आहे असं त्याच्या सोशल अकाउंट वरून दिसून येतं.त्यामुळे सिनेमाप्रमाणेच सिध्दार्थ त्याच्या हटके सेल्फीमधूनही चाहत्यांना वेड लावताना दिसतोय.