Join us

म्हणून मुक्ता बर्वे आणि सुबोध भावे तब्बल नऊ वर्षांनंतर आले एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2017 13:57 IST

विक्रम फडणीस निर्मित आणि दिग्दर्शित‘हृदयांतर’ चित्रपटामध्ये अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि अभिनेता सुबोध भावे पती-पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहेत. 'एक डाव ...

विक्रम फडणीस निर्मित आणि दिग्दर्शित‘हृदयांतर’ चित्रपटामध्ये अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि अभिनेता सुबोध भावे पती-पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहेत. 'एक डाव धोबापछाड' ह्या चित्रपटानंतर मुक्ता-सुबोध तब्बल नऊ वर्षांनी एकत्र दिसणार आहेत. हृदयांतर चित्रपटामध्ये सोनाली खरे, मुक्ता बर्वे आणि सुबोध भावे यांच्या मुख्य भूमिका आहेत. जोशी कुटूंबाच्या या कथेमध्ये सौ. समायरा जोशीच्या भूमिकेत मुक्ता बर्वे तर श्री. शेखर जोशीच्या भूमिकेत सुबोध भावे झळकणार आहेत.अभिनेता सुबोध भावे याविषयी सांगतो, “मुक्ता आणि मी दोघेही पुण्यातले आहोत. त्यामुळे आमची मैत्री आम्ही कॉलेजमध्ये असताना भाग घेतलेल्या, पुरूषोत्तम करंडक स्पर्धेपासूनची आहे. मुंबईत आल्यावर आम्ही बंधन मालिका केली. त्यानंतर एक डाव धोबी पछाड सिनेमा केला. ती माझी खूप जुनी मैत्रीण आहेच. पण तिच्या कामाबद्दल मला अतिशय आदरही आहे. तिच्यासोबत काम करताना मी नेहमीच रिलॅक्स असतो.” तर अभिनेत्री मुक्ता बर्वेने सांगितले की, “महाविद्यालयात असतानाचा हॅंडसम हंक, ज्याच्याशी एकदा तरी बोलावंसं वाटावं असा लाखो तरूणींच्या 'दिल की  धडकन‘सुबोध भावे’ ते माझा जिवलग मित्र सुब्या असा सुबोधच्या आणि माझ्या मैत्रीचा प्रवास झालाय. सुरूवातीच्या काळात सुबोधने दिग्दर्शित केलेल्या एका नाटकाचे कॉस्च्युम्सही मी केले होते. आणि ‘हृदयांतर’हा चित्रपट आमच्या दोघांसाठी नक्कीच एक अविस्मरणीय ठरणार आहे.”9 जूनला चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार असून एकीकडे आनंद वाटत असून थोडं दडपणही आल्यांचे विक्रम फडणीसने म्हटले आहे.खुद्द बॉलिवूडचा हँडसम हंक' म्हणून ओळखला जाणारा हृतिक रोशनही या चित्रपटात पाहूणा कलाकराच्या भूमिकेत झळकणार आहे.