Join us

So Cute: गायिका प्रियंका बर्वेच्या चिमुकल्याच्या बाललीला पहा, व्हिडीओ तुफान व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2021 19:05 IST

प्रियंकाच्या मुलाचे नाव युवान आहे. शेअर केलेल्या व्हिडीओतमध्ये युवानच्या बाललीला सध्या प्रत्येकासाठी चर्चेचा विषय ठरल्यात.

नेहमी आपल्या गायिकीने रसिकांच्या मनाचा ताबा मिळणारी गायिका प्रियंका बर्वेचा एका व्हिडीने सोशल मीडियावर सा-यांचे लक्ष वेधून घेतले आहे.  सोशल मीडियावरही बरीच सक्रीय असते. बरेच फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. प्रियंका बर्वेने तिचा रियाज करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला. आणि हा व्हिडीओ शेअर करताच तुफान व्हायरल झाला.

 

यावेळी चाहत्यांची नजर ही प्रियंकावर नसून तिच्या चिमुरड्यावर होती. प्रियंकाच्या मुलाचे नाव  युवान आहे. शेअर केलेल्या व्हिडीओतमध्ये युवानच्या  बाललीला सध्या प्रत्येकासाठी चर्चेचा विषय ठरल्यात.यात युवान आईला साथ देताना दिसत आहे. युवान आईच्या मागोमाग आलाप घेतानाही दिसत आहे. 

प्रियंकाचा युवानसोबत रियाज करतानाचा आनंदही तिच्या चेह-यावर ओसंडून वाहतोय. हा व्हिडीओ शेअर करत तिने समर्पक अशी कॅप्शनही दिली आहे. 'वर्क इन प्रोगेस' म्हणत तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे.प्रियंका पाठोपाठ  सोशल मीडियावर युवानदेखील सा-यांच्या पसंतीस पात्र ठरत आहे.

 त्याच्या बाललीला आणि त्याचा निरागसपणा साऱ्यांनात भावतो आहे.प्रियंका बर्वेने 8 ऑगस्ट 2020 युवान जन्म दिला होता.गेले अनेक दिवस ती सोशल मीडियावर बाळाचे फोटो पोस्ट करत आहे. तिनं 'युवान'चा चेहरा कुठल्याही फोटोमध्ये दाखवला नव्हता दिवाळीनिमित्त शेअर केलेल्या फोटोमध्ये तिनं पहिल्यांदा बाळाची झलक दाखवली होती. 

लग्नानंतर प्रियंका खाजगी आयुष्यात रमली. पती सारंग कुलकर्णीसह ती नेहमीच क्वॉलिटी टाईम एन्जॉय करताना दिसली. दोघांमध्ये खूप घट्ट केमिस्ट्री आहे.प्रियंकाने मराठीसह बॉलिवूडमध्ये देखील पार्श्वगायन केले आहे.

 

‘काळोखाच्या वाटेवरती उजेडा रुसला बाई’ याच्या पार्श्वगायनासाठी तिला राज्य पुरस्कार मिळाला.‘आनंदी गोपाळ’, ‘रमा माधव’, ‘लॉस्ट अँड फाऊंड’, ‘डबल सीट’ या चित्रपटांसाठीही तिने गायन केलं आहे.