Join us

स्नेहा का म्हणाली भन्सालींना थँक्यु...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2016 12:53 IST

           संजय लीला भन्साली हे नाव बॉलीवुडमध्ये एवढ मोठ आहे की प्रत्येक फिल्म इंडस्ट्रीतील कलाकाराला ...

           संजय लीला भन्साली हे नाव बॉलीवुडमध्ये एवढ मोठ आहे की प्रत्येक फिल्म इंडस्ट्रीतील कलाकाराला यांच्या सोबत काम करण्याची इच्छा असते. भन्साली लाल इश्क हा सिनेमा घेऊन मराठी मध्ये पदापर्ण करीत आहेत हे तर आपल्या सगळ््यांनाच माहितीय, परंतू या चित्रपटातील दुसरी अभिनेत्री स्नेहा चव्हाण सध्या भन्सालींवर जाम खुष आहे. आता स्नेहाचा हा पहिलाच चित्रपट आहे अन तो ही डायरेक्ट भन्सालींचा म्हणटल्यावर ती जाम खुष असणारच ना. परंतू तिच्या या हॅपीनेसचे कारण काही दुसरेच आहे. खुद्द संजय लीला भन्साली यांनी स्नेहाच्या कामाचे कौतुक केले अन तीला यु आर वेरी गुड अ्से म्हटले आहे. आता स्नेहाची तारीफ भन्सालींनीच केली म्हटल्यावर तीचा आनंद गगनात मावणार नाही हेच खरे. आणि म्हणुनच स्नेहाने भन्सालींचे सोशल साईट्सवर आभार मानीत त्यांना थँक्यु म्हटले आहे.