स्मिता तांबे करणार लघुपटाचे दिग्दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2017 13:43 IST
मराठी चित्रपटसृष्टीत प्रत्येक कलाकार एका विशेष जबाबदारीनंतर एक नवीन जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करत असतो. त्या दिशेने तो प्रयत्नदेखील ...
स्मिता तांबे करणार लघुपटाचे दिग्दर्शन
मराठी चित्रपटसृष्टीत प्रत्येक कलाकार एका विशेष जबाबदारीनंतर एक नवीन जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करत असतो. त्या दिशेने तो प्रयत्नदेखील करत असतो. असाच काहीसा प्र्रयत्न अभिनेत्री स्मिता तांबे हिने केला आहे. हो, आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री स्मिता तांबे ही लवकरच प्रेक्षकांना एका नवीन भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या अभिनेत्रीने नुकतेच एका लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे. तिच्या या लघुपटाचे नाव अॅक्लेट असे आहे. तिच्या या लघुपटाविषयी स्मिता तांबे लोकमत सीएनएक्सला सांगते, माझा हा लघुपट करण्याचा अनुभव खूपच छान होता. एक नवीन जबाबदारी पार पाडताना खूपच मजा आहे. या लघुपटाची कथा गॅझेटच्याभोवती फिरणारी आहे. कुठेतरी मनामध्ये एक इमोशन होती. ती प्रत्यक्ष पडदयावर यावी असे मनापासून वाटते होते. तोच हा प्रयत्न या लघुपटच्या माध्यमातून केला आहे. अभिनेत्रीनंतर दिग्दर्शन करणे ही एक मोठी जबाबदारी आहे. ती पार पाडण्याचा मी अतोनात प्रयत्न केला आहे. माझ्या या लघुपटामध्ये विनीत कुमार, जतीन जैस्वाल, विक्रम कोचर अशा अनेक कलाकारांचा समावेश आहे. त्याचबरोबर या लघुपटात गॅलिना नावाची एक रशियन अॅक्टरदेखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. स्मिताने यापूर्वी नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजवले आहे. तिने मराठी चित्रपटसृष्टीला अनेक चित्रपट दिले आहेत. यामध्ये जोगवा, ७२ मैल, गणवेश, तुकाराम, नातीगोती अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे. त्याचबरोबर ती सिंघम रिटर्न्स या चित्रपटातदेखील पाहायला मिळाली. अशा पध्दतीने नेहमीच या अभिनेत्रीने मराठी आणि हिंदी चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे.