Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्मिता पाटील यांचा अभिनयाचा वारसा पुढे चालवणार ही खानदेश कन्या,यांच्यासोबत तिचं खास नातं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2018 12:29 IST

झिल ही स्मिता पाटील यांची दूरच्या नात्याने भाची असून ती नंदुरबार जिल्यातील शहादा येथील राहणारी आहे.

आपल्या संवेदनशील अभिनयाने मंत्रमुग्ध करणाऱ्या स्मिता पाटीलच्या भाचीचे म्हणजेच खान्देश कन्या म्हणून प्रसिद्ध असलेल्या झिल पाटील मराठी सिनेमात पदार्पण करत आहे. अखिल देसाई दिग्दर्शित शिष्यवृत्ती या मराठी सिनेमातुन झिल पदार्पण करत असून, या सिनेमात तिचा नायक थ्री इडियटमधील सेंटीमीटर अर्थात दुष्यंत वाघ आहे. झिल ही स्मिता पाटील यांची दूरच्या नात्याने भाची असून ती नंदुरबार जिल्यातील शहादा येथील राहणारी आहे.

ओ थ्री शॉपिंग निर्मित, साज इंटरनेटमेंट सहनिर्मित, अखिल देसाई दिग्दर्शित शिष्यवृत्ती या सिनेमात झिल पाटील, सीमा नावाच्या महिला शिक्षिकेची भूमिका साकारत आहे. आपल्या भूमिकेबद्दल झिल सांगते की, छोट्याशा गावात मराठी शाळेत शिकवणारी शिक्षिका मी साकारते आहे. लहान मुलांच्या उपजत गुणांना प्रोत्साहन देणारी अशी ही शिक्षिका आहे, शाळेत नव्यानेच आलेल्या प्रशांत गावडे (दुष्यंत वाघ) यांच्या चांगल्या गुणांचा ती आदर करू लागते. सरांच्या वक्तशीरपणा, गुणवत्ता या गोष्टी तिला आवडू लागतात. शाळेत घडलेल्या एका अनपेक्षित घटनेमुळे पुढे सर माझ्यासाठी माझ्या आईकडे लग्नाची मागणी घालतात आणि गोष्ट पुढे सरकते.

सिनेमात येण्याबद्दल झिल सांगते की, माझा जन्म खेडेगावात झाला त्यामुळे मला शेतीची आवड आहे, म्हणूनच माझे शिक्षण देखील बीएससी ऍग्रीकल्चर मध्येच झाले आहे. सिनेमात येण्याचा माझा अजिबात विचार नव्हता, परंतु माझ्या एका मित्राने फेसबुकवर माझा प्रोफाइल अपलोड केल्याने मला सुरुवातीला काही प्रिंट जाहिरातीमध्ये झळकण्याची संधी मिळाली. चित्रपट दिग्दर्शक अखिल देसाई यांच्याशी ओळख झाली आणि त्यांनी मला पाहताच माझी निवड केली, सुरुवातीला काही वर्कशॉप आम्ही केले. मग सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली.

पण हे वाटतं तेवढं सोपं अजिबात नव्हतं कारण,चित्रीकरणा दरम्यान दिग्दर्शक माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले आणि त्यांना अपेक्षित असा अभिनय माझ्याकडून करून घेतला, म्हणूनच मी भूमिकेला न्याय देऊ शकली. सिनेमात काम करण्यासाठी माझ्या कुटुंबाचा विरोध होता,फक्त माझ्या आईने मला प्रोत्साहन दिले होते आणि म्हणूनच मी हा सिनेमा करु शकली. या सिनेमात माझ्या सोबत दुष्यंत वाघ आणि कमलेश सावंत, उदय सबनीस, अनिकेत केळकर, अंशुमन विचारे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सिनेमाचे चित्रीकरण सध्या शहापूर मध्ये सुरू असून लवकरच सिनेमा प्रदर्शित होणार आह.

टॅग्स :स्मिता पाटील