Join us

स्मिता आणि श्रेयस एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2016 13:28 IST

पप्पी दे पप्पी दे या गाण्यातून प्रेक्षकांपर्यत पोहोचलेली सुंदर अभिनेत्री स्मिता गोंदकर आता, अभिनेता श्रेयस तळपदे सोबत प्रतिछाया या ...

पप्पी दे पप्पी दे या गाण्यातून प्रेक्षकांपर्यत पोहोचलेली सुंदर अभिनेत्री स्मिता गोंदकर आता, अभिनेता श्रेयस तळपदे सोबत प्रतिछाया या हिंदी चित्रपटातून एकत्र झळकणार आहे. हया चित्रपटाचे दिग्दर्शन मुकेश जाधव यांनी केले असून हा चित्रपट सायको थ्रिलर या गोष्टीवर आधारित हा चित्रपट असल्याचे स्मिता गोंदरकरने लोकमत सीएनएक्सला सांगितले. स्मिता म्हणाली, या चित्रपटात मी श्रेयसच्या फ्युयानसीची भूमिका केली आहे. श्रेयससोबतचा हा अनुभव अप्रतिम होता. तसेच हिंदीमध्ये काम करताना खूप छान वाटलं. दिग्दर्शकसहित बरेच कलाकारदेखील मराठी असल्यामुळे पूर्ण सेटवर मराठमोळी वातावरण होते. आम्ही खूप मज्ज-मस्ती एन्जॉय केली. तसेच श्रेयसदेखील एका वेगळया भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार. हे दोन मराठीमोळे कलाकार एका बॉलीवुड चित्रपटात एकत्रित पाहताना नक्कीच, प्रेक्षकांना भारी वाटेल.