Rohit Raut: 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' या कार्यक्रमातून गायक रोहित राऊत घराघरात पोहोचला. आपल्या सुमधुर गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध करणारा रोहित राऊत आजवर अनेक रिअॅलिटी शोमध्ये झळकला आहे. अलिकडेच I-Popstar या संगीत रिअॅलिटी शोचे विजेतेपदावर त्याने आपलं नाव कोरलं. दरम्यान, रोहितची पत्नी जुईली जोगळेकर देखील लोकप्रिय गायिक आहे. २०२२ साली त्यांनी लग्न केलं. परंतु, लग्नाआधी रोहित आणि जुईली लिव्हइनमध्ये राहत होते. मात्र, त्यांनी हा निर्णय का घेतला एका मुलाखतीमध्ये रोहितने याबद्दल खुलासा केला आहे.
नुकतीच रोहित राऊत याने 'आरपार'ला दिलेल्या मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने वेगवेगळ्या विषयांवर आपलं मत व्यक्त केलं. दरम्यान, रोहित राऊतने त्यांच्या लिव्हइन रिलेशनशिपच्या निर्णयालवर देखील भाष्य केलं. तो म्हणाला, लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहणं ही आमची गरज होती.कारण तेव्हा आमच्या दोघांकडे काहीच पैसे नव्हते.लॉकडाऊन होण्याच्या आधी फक्त ८ महीने अगोदर मी इंडियन आयडलमध्ये होतो. त्यादरम्यान मी बाहेरचं रेकॉर्डिंग केलं नव्हतं. त्यामुळे माझ्याकडे पैसेच नव्हते. आम्ही स्पर्धेत जे काही पैसे मिळवतो ते आम्हाला ९० दिवसानंतर मिळतात आणि तेही ३० टक्के कट होऊन रक्कम मिळते. त्यामुळे ठरलेली रक्कम कधीच मिळत नाही. बरं, तेव्हा ती सुद्धा भाड्याच्या घरात होती. आणि माझीही तिच परिस्थिती होती. त्या ६ महिन्यानंतर असं झालं की आता हे सगळं नाही होतं. मग आम्ही आमच्या घरच्यांना सांगितलं की अशी परिस्थिती आहे. आता इतका खर्च करणं आम्हाला शक्य नाही.
मग पुढे रोहित म्हणाला,"मी रिलेशनशिपमध्ये राहतोय हे मी माझ्या बाबांना सांगितलं होतं. जुईच्या बाबांनाही मी हेच म्हणालो की जर पुढचा संसार सुरळीत चालवायचा असेल तर आतापासून पैसे कमवायला पाहिजेत. जे आता तिच्याकडेही नाहीत आणि माझ्याकडेही नाहीत, तुम्ही ठरवा आम्ही लिव्हइन मध्ये राहायचं की नाही. यासाठी आम्हाला त्यांना खूप विनवण्या कराव्या लागल्या होत्या." असा खुलासा करत रोहितने लिव्हइनमध्ये राहण्याचं कारण सांगितलं.
अशी होती कुटुंबियांची प्रतिक्रिया
या मुलाखतीत रोहित म्हणाला,"त्याच्याआधी इंडियन आयडॉल संपल्यानंतर एक महिन्यांच्या ब्रेकनंतर लगेच आम्ही लग्न करायचा निर्णय घेतला होता. आमचं ठरलं होतं. शिवाय असं नव्हतं की आमच्याबद्दल आई-वडिलांनाच माहित होतं. आमच्या मित्र-मंडळींनाही लग्नाबद्दल कल्पना होती. त्यावेळी आधीच घरी सांगितलं होतं की, आम्हाला एकमेकांशी लग्न करायचं आहे. त्यामुळे घरच्यांना या गोष्टी सांगायला सोप झालं आणि ते तयारही झाले."
Web Summary : Singer Rohit Raut disclosed financial struggles led him and wife, Juili, to live-in before marriage. They lacked funds post-Indian Idol, needing parental consent to manage expenses.
Web Summary : गायक रोहित राऊत ने बताया कि आर्थिक तंगी के कारण उन्हें और पत्नी जुईली को शादी से पहले लिव-इन में रहना पड़ा। इंडियन आइडल के बाद उनके पास पैसे नहीं थे, खर्चों के लिए माता-पिता की सहमति जरूरी थी।