Join us

हे काय वागणं आहे सिद्धार्थ?  मिताली मयेकरने नवरोबाला विचारला जाब

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2021 12:41 IST

लग्नाला उणेपुरे तीन महिने होत नाही तोच, मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्यात भांडणं सुरु झाली आहेत. अर्थात हे भांडण फार गंभीरपणे घ्यायची गरज नाही...

ठळक मुद्दे दोन वर्षांपूर्वी व्हॅलेंटाइन डेला पहिल्यांदा सिद्धार्थने इन्स्टाग्राम पोस्टमधून आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर त्याच वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात सिद्धार्थने मितालीला प्रपोज केले होते.

मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Sidharth Chandekar) व अभिनेत्री मिताली मयेकर (Mitali Mayekar) याचवर्षी 24 जानेवारीला लग्नबंधनात अडकले. पुण्यातील ढेपे वाडा येथे मोठ्या थाटामाटात हा शाही विवाहसोहळा पार पडला होता. पण या लग्नाला उणेपुरे तीन महिने होत नाही तोच, मिताली आणि सिद्धार्थ यांच्यात भांडणं सुरु झाली आहेत. अर्थात हे भांडण फार गंभीरपणे घ्यायची गरज नाही. कारण सिद्धार्थ व मितालीच्या नात्याइतकेच हे भांडणही गोड आहे. अर्थात तरीही हे भांडण नेमके कशामुळे झाले? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच. तर सिद्धार्थने शेअर केलेला एक फोटो आणि त्याच्या कॅप्शनमुळे.

होय, सिद्धार्थने इन्स्टा अकाऊंटवर एक गोड फोटो शेअर केला. पण या फोटोला त्याने दिलेले कॅप्शन पाहून मिताली कमेंट करण्यापासून स्वत:ला रोखू शकली नाही. तिच्या या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.‘तुम्ही तिच्याकडे बराच वेळ बघत असता आणि अचानक तिची नजर तुमच्याकडे वळते तेव्हा...,’ असे कॅप्शन सिद्धार्थने आपल्या फोटोला दिले. यावर मितालीची कमेंट आली आणि बघता बघता तिच्या या कमेंटची चर्चा रंगली.

‘हे काय वागणं झालं?’असे मितालीने यावर कमेंट करताना लिहिले. बायको रागावलीये, हे समजायला सिद्धार्थला वेळ लागला नाही. मग काय, ‘अगं मी तुझ्याविषयीच बोलत होतो,’ असे मजेशीर उत्तर सिद्धार्थने यावर दिले. सिद्धार्थ व मितालीचे हे गोड भांडण मग जगजाहिर झाले. अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्यात. ‘मेन विल बी मेन...,’ अशा काय काय मजेदार प्रतिक्रिया यावर उमटल्या.

 दोन वर्षांपूर्वी व्हॅलेंटाइन डेला पहिल्यांदा सिद्धार्थने इन्स्टाग्राम पोस्टमधून आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर त्याच वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात सिद्धार्थने मितालीला प्रपोज केले होते.

टॅग्स :सिद्धार्थ चांदेकरमिताली मयेकर