सिध्दार्थ का भडकला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2016 18:12 IST
ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्याविषयीची वाईट बातमी कालपासून सोशल मीडियावर फिरत आहे. मात्र ही एक अफवा असल्याचे समोर आले ...
सिध्दार्थ का भडकला?
ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्याविषयीची वाईट बातमी कालपासून सोशल मीडियावर फिरत आहे. मात्र ही एक अफवा असल्याचे समोर आले आहे. या अफवाविषयी मात्र अभिनेता सिध्दार्थ चांदेकर मात्र चांगलाच भडकला असल्याचे सोशल मिडीयावर पाहायला मिळत आहे. सिध्दार्थने अफवा पसरविणाºया लोकांची चांगलीच खरडपट्टी केले असल्याचे सोशल मीडियावर दिसत आहे. सिध्दार्थने नुकतेच एक पोस्ट अपडेट केली आहे. तो आपल्या पोस्टच्या माध्यमातून सांगतो, ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्याबाबतीत फिरणारी पोस्ट ही साफ खोटी आहे. ते एकदम व्यवस्थित आहे. त्यांच्याबाबतीत ज्यांनी कोणी हे मॅसेज पसरविले आहेत. त्यांना लाथा बुक्क्यांनी मारलं गेलं पाहिजे. कोणत्याही मॅसेजची पूर्णपणे शहानिशा न करता आलेला मॅसेज तसाच फॉरवर्ड करत राहतात. या माणसाचा अपघात, त्या माणसाचा मृत्यू उगाच काही माहित नसताना हा मॅसेज फिरवत राहतात. आपला व्हॉटसअॅप मॅसेज पहिला पोहचला पाहिजे या रेसमध्ये आपण किती बकवास वृत्तीचे होत चाललो आहोत. या गोष्टीची त्यांना फिकीर नसते. अशा लोकांची लायकी नाही. कृपया करून अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. असे देखील यावेळी सिध्दार्थने सांगितले आहे. सिध्दार्थच्या या विचारांना सोशल मीडियावरदेखील मोठया प्रमाणावर कमेंन्ट पाहायला मिळाल्या आहेत. त्याच्या चाहत्यांनीदेखील अशा अफवांबाबतीत नाराजी व्यक्त केली आहे. नुकताच सिध्दार्थचा वजनदार हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्याचबरोबर तो बनमस्का या मालिकेतदेखील प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. तसेच त्याने क्लासमेट, आॅनलाइन, बिनलाइन, लॉस्ट अॅण्ड फाउंड, पिंडदान, झेंडा, सतरंगी रे असे अनेक चित्रपट केले आहेत.