स्माईलक्वीन सोबत सिध्दार्थची मजा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2016 13:24 IST
माधुरीच्या हास्यावर आज जगभरातील तिचे चाहते फिदा आहेत. माधुरी तिच्या निरागस स्माईलसाठी ओळखली ...
स्माईलक्वीन सोबत सिध्दार्थची मजा
माधुरीच्या हास्यावर आज जगभरातील तिचे चाहते फिदा आहेत. माधुरी तिच्या निरागस स्माईलसाठी ओळखली जातेच. पण आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये देखील अशी स्माईलक्वीन आहे. आता ही स्माईलक्वीन कोण बर आहे असे नक्कीच तुम्हाला वाटत असेल. हम आपके है कौन या चित्रपटामधील माधुरी सोबत झळकलेली आपली मराठी अभिनेत्री रेणुका शहाणे यांना कोणीच विसरु शकत नाही. हम आपके है कौन मधील रेणुकाचा अभिनय तर एॅप्रिशिएट झालाच परंतू तिच्या स्माईलवरच अनेकजण घायाळ झाले. रेणुकाच्या याच स्माईलवर आपला रांगडा अभिनेता सिध्दार्थ जाधव देखील फिदा आहे. त्याचे झाले असे की सिध्दार्थ एका कार्यक्रमा दरम्यान रेणुकाला भेटला अन त्यावेळी या दोघांनी भरपुर मजा मस्ती तर केलीच परंतू झक्कास फोटोसेशनही केले. आता समोर ही स्माईलक्वीन असताना सिध्दार्थला तिचे हास्य कॅमेरॅत टिपण्याची भुरळ तर पडणारच ना. मग काय सिध्दार्थने काढला कॅमेरा अन मस्त फोटो कॅप्चर केले. एवढेच नाही तर त्याने हे फोटोज सोशल साईट्सवर अपलोड केलेत. विथ स्माईलक्वीन रेणुकताई, मज्जा, फुल आॅन धमाका अशा शब्दात सिध्दार्थने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. }}}}