Join us

सिध्दार्थचा फॅमिली सेल्फी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2016 16:31 IST

कलाकार म्हटले की, अ‍ॅक्शन, कॅमेरा, टेक, रिटेक यामध्येच सतत व्यस्त असतो. त्याला स्वत:साठीच काय फॅमिलीसाठीदेखील वेळ मिळत नाही. जर ...

कलाकार म्हटले की, अ‍ॅक्शन, कॅमेरा, टेक, रिटेक यामध्येच सतत व्यस्त असतो. त्याला स्वत:साठीच काय फॅमिलीसाठीदेखील वेळ मिळत नाही. जर वेळ मिळालाच तर कलाकाराला तो सोन्यापेक्षा ही पिवळा असतो. अशीच एक संधी अभिनेता सिध्दार्थ जाधव याला मिळाली आहे. सिध्दार्थने नुकेतच सोशलमीडियावर आपल्या फॅमिलीसोबतचा एक सेल्फी अपलोड केला आहे. या फोटोमध्ये सिध्दार्थ खूपच आनंदित दिसत आहे. स्वरा व इरा या आपल्या दोन मुलीं व बायको तृप्तीसोबत सिध्दार्थ धमाल करत असल्याचेदेखील पाहायला मिळत आहे. या फोटोसोबत अपडेट केलेल्या स्टेटसवरून सिध्दार्थ सांगतो, माझ्या बिझी शेडयुल्ड मधून सुट्टी घेण्याचे कारण म्हणजे माझी फॅमिली. मला त्यांच्यासाठी वेळ देणे महत्वाचे होते. माझी फॅमिली माझ्यासाठी प्रेम, ताकद, जीवन सर्वकाही आहे.