Join us

​सिद्धार्थ चांदेकर रवाना झाला लंडनला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2017 17:57 IST

सिद्धार्थ चांदेकरने अग्निहोत्र या मालिकेद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर तो झेंडा, बालगंर्धव, सतरंगी रे, क्लासमेट्स, वजनदार यांसारख्या चित्रपटांमध्ये काम ...

सिद्धार्थ चांदेकरने अग्निहोत्र या मालिकेद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर तो झेंडा, बालगंर्धव, सतरंगी रे, क्लासमेट्स, वजनदार यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याने हिंदी मालिकांमध्येही काम केले आहे. सिद्धार्थने खूपच कमी वेळात मराठी चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण केले आहे. सिद्धार्थच्या या यशासाठी त्याचे नेहमीच कौतुक केले जाते. सिद्धार्थ नेहमीच त्याच्या सोशल नेटवर्किंग साइटवर अॅक्टिव्ह असतो. त्याच्या आयुष्यातील खाजगी गोष्टी तो सोशल मीडियावर शेअर करत असतो. तसेच तो कोणत्या चित्रपटात काम करत आहे. चित्रपटाचे चित्रीकरण कसे सुरू आहे याविषयी देखील तो माहिती देत असतो. तो सध्या गुलाबजाम या चित्रपटात काम करत आहे. या चित्रपटात तो सोनाली कुलकर्णीसोबत झळकणार आहे. सोनालीसोबत काम करण्याची ही त्याची पहिलीच वेळ आहे. या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना सोनाली आणि सिद्धार्थ अशी नवी जोडी पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर देखील सिद्धार्थने सोशल मीडियावर शेअर केले होते. तसेच या चित्रपटाचे चित्रीकरण कुठे सुरू आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान तो किती मजा मस्ती करतो हे सगळे तो त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट करत असे. या चित्रपटाचे नुकतेच चित्रीकरण पूर्ण झाले असून सिद्धार्थने त्याच्या सोशल नेटवर्किंगवरून याची घोषणा केली आहे. तसेच या चित्रपटाचे चित्रीकरण करताना खूप मजा मस्ती आली असे त्याने त्या पोस्टमध्ये म्हटले आहे.या चित्रपटाचे चित्रीकरण संपून काहीच दिवस झाले असून आता सिद्धार्थ लंडनला रवाना झाला आहे. सिद्धार्थ लंडनला गेला असल्याचे त्याने त्याच्या सोशल नेटवर्किंगवरून त्याच्या फॅन्सना सांगितले आहे. तो कोणत्या कारणासाठी लंडनला गेला याचा उल्लेख त्याने केला नसला तरी तो लवकरच परतणार असल्याचे त्याने म्हटले आहे.