Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाआधीच सिद्धार्थ व मितालीचं रोमँटिक फोटोशूट, फोटोंची सोशल मीडियावर होतेय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 12:56 IST

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि त्याची होणारी भावी पत्नी म्हणजेच अभिनेत्री मिताली मयेकर हे दोघं सातत्यानं सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत असतात.

मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून ओळखल्या जाणारा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि त्याची होणारी भावी पत्नी म्हणजेच अभिनेत्री मिताली मयेकर हे दोघं सातत्यानं सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत असतात. या दोघांचा यावर्षी जानेवारी महिन्यात साखरपुडा पार पडला. त्याआधीपासून ते दोघं सोशल मीडियावर त्यांचे एकत्र फोटो शेअर करत असतात. 

सिद्धार्थ व मिताली यांनी नुकतेच एकत्र फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ते दोघं वेस्टर्न आऊटफिटमध्ये दिसत आहेत. हे फोटोशूट मचानमध्ये करण्यात आलं असून ते बाथटबमध्ये दिसत आहेत.या फोटोंमध्ये सिद्धार्थ ब्लेझरमध्ये दिसतो आहे तर मिताली लाँग गाऊनमध्ये दिसते आहे.

‘उर्फी’ चित्रपटातून मितालीनं चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं त्यानंतर झी युवावरच्या ‘फ्रेशर्स’ मालिकेतही मितालीनं काम केलं आहे. तर ‘गुलाबजाम’, ‘क्लासमेट’ सारखे अनेक चित्रपट ‘अग्नीहोत्र’, ‘प्रेम हे’ सारख्या मालिकेतून सिद्धार्थनं प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.

गेल्या वर्षी व्हॅलेंटाइन डेला पहिल्यांदा सिद्धार्थनं इन्स्टाग्राम पोस्टमधून आपल्या प्रेमाची कबुली दिली होती.

सप्टेंबर महिन्यात सिद्धार्थनं मितालीला प्रपोज केलं होतं. सिद्धार्थनं त्यावेळीही देखील मितालीसोबतचा फोटो शेअर करत तिला प्रपोज केलंय आणि तिनं होकारही दिला असं म्हणत आयुष्यातील सर्वात खास व्यक्तीची नव्यानं ओळख आपल्या चाहत्यांना करून दिली होती.

आता मिताली व सिद्धार्थ लग्नबेडीत कधी अडकणार हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत.

टॅग्स :सिद्धार्थ चांदेकरमिताली मयेकर